दहावी, बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांमुळे मुख्याध्यापकांचा ताप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:29+5:302021-04-20T04:18:29+5:30
दरम्यान, एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप केले होते. ...

दहावी, बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांमुळे मुख्याध्यापकांचा ताप वाढला
दरम्यान, एप्रिलमध्येच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांना हे साहित्य वाटप करण्यात आले. याचवेळी परीक्षा रद्द केल्याने प्राप्त झालेले साहित्य सांभाळण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे.
चौकट-
परीक्षेच्या साहित्यामध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टिकर, सिटींग प्लॅन, ए. बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकाेड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका आदींचा समावेश आहे.
प्रतिक्रिया-
१. दहावी, बारावी परीक्षेचे केंद्र आमच्या शाळेत आले. त्यामुळे या दोन्ही वर्गांच्या परीक्षेचे साहित्य आमच्याकडे प्राप्त झाले आहे. आता शाळा बंद असल्या तरी हे साहित्य सांभाळण्याची जबाबदारी शाळेवर आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतली जात आहे.
- मुख्याध्यापक पवळे, शिवाजी कॉलेज, माणिकनगर, नांदेड.
२.कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. मात्र, परीक्षेची संपूर्ण तयारी आम्ही केली होती. त्यामुळे परीक्षेचे साहित्यही आमच्याकडे प्राप्त झाले हाेते. परंतु आता परीक्षा कधी होणार याची माहिती नसल्याने जोपर्यंत परीक्षा होत नाहीत, ताेपर्यंत हे साहित्य सांभाळावे लागणार आहे.
- के. एस. जाधव, राजीव गांधी हायस्कूल. नांदेड.
३. दहावीचे वर्षभर ऑनलाईन वर्ग घेतले होते. त्यानंतर दहावीच्या परीक्षेसाठी आम्ही सर्व नियोजन केले होते. परंतु शासनाने कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर टाकल्या असून प्राप्त झालेले साहित्य आता सांभाळावे लागणार आहे. ही एक मोठी जबाबदारीच आहे.
- मुख्याध्यापक डॉ. डब्ल्यू. एच. शेख, जिल्हा परिषद शाळा, अर्धापूर.