शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापालिकेत भाजपचा 'एकला चलो रे' चा नारा; काँग्रेस-उद्धवसेना एकत्र लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:10 IST

भाजपाचा रथ रोखण्यासाठी काँग्रेस उद्धवसेनेला सोबत घेवून रणसंग्रामात उतरणार असल्याचे समजते.

- अविनाश चमकुरेनांदेड : नगरपालिका निवडणुकादरम्यान शिंदेसेनेने खेळलेली खेळी भाजप पुन्हा नांदेडमध्ये खेळू पाहत आहे. राज्य नेत्यांच्या आदेशानुसार भाजप, युतीसाठी बैठकांचे सोपस्कार पार पाडले आहेत. आतापयर्यंत पार पडलेल्या जवळपास पाच ते सहा बैठकांमध्ये युतीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. जागा वाटपांवर एकमत न झाल्याने भाजपा नेतृत्वाने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, भाजपाचा रथ रोखण्यासाठी काँग्रेस उद्धवसेनेला सोबत घेवून रणसंग्रामात उतरणार असल्याचे समजते.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीत नेतेमंडळींचे एकमत न झाल्याने त्याचा फटका निकालावर बसला होता. तर स्वतंत्र लढल्याने काही ठिकाणी फायदा झाल्याचेही दिसून आले होते. दोन्ही अनुभव लक्षात घेता महापालिका निवडणुकीत भाजपा व शिंदेसेना एकत्र येणार का? यावरुन राजकीय वर्तुळात मा फेरी झाडत होत्या. परंतु दुसरीकडे युती झाली तर कोणत्या प्रभागातून कोणत्या पक्षाला उमेद्वारी मिळणार याबाबत स्पष्टता नसल्याने नगरसेवक होण्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या इच्छुकांची घालमेल चांगलीच वाढली होती. त्यात वरिष्ठ नेतेमंडळी काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागून होते. भाजपा व शिंदेसेनेकडून एकमेकांवर होत असलेले आरोप व जास्तीत जास्त जागांवर करण्यात येत असलेल्या दाव्यामुळे युती होईल असे वाटत नव्हते. शिंदेसेनेने नांदेड दक्षिणमधून १० तर उत्तरमधून १५ जागांची मागणी केली होती. मात्र भाजपा एकूण ८ पेक्षा जास्त जागा सोडायला तयार नाही.

एकीकडे युतीसाठी चर्चा सुरु असताना दुसरी शक्यता लक्षात घेता गत निवडणुकीत असलेली सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षाने मवाळ भूमिका घेत उद्धवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) शिलेदारांसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. माहितीनुसार महापालिकेतील ८१ जागांपैकी २० जागांवर उद्धवसेनेचे उमेदवार राहतील. उर्वरित जागा काँग्रेस पक्षातील उमेदवार त्यांच्या व्होट बँक लक्षात घेवून लढणार असल्याचे बोलले जात आहे.

आघाडीची घडी बसविण्यासाठी 'ठाकरे' नांदेडातनगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये आघाडी होऊ न शकल्यामुळे झालेले मतविभाजन आणि त्यातून झालेले नुकसान टाळण्यासाठी आता महापालिका निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीची बिघडलेली घडी बसविण्यासाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे रविवारी रात्री नांदेडात मुक्कामी आले आहेत. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षातील स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन जागांची वाटाघाटी केली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष हनमंत बेटमोगरेकर, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनीही आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जातील.

वंचितनेही घोषित केले उमेदवारमहापालिका निवडणूकीत एकवेळ काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. मात्र एमआयएमसोबत युती करणार नसल्याचे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, एमआयएमने रविवारी २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा ९ जणांची पहिली यादी रात्री उशीरा घोषित केली आहे.

एमआयएमची पहिली यादी जाहीरनुकतेच काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केला होता. त्यावरून राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच रविवारी एमआयएमने पाच प्रभागांतील २० उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान सोमवारी बहुतांश पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. युती व आघाडी झाल्यास आपला पत्ता कट होण्याचीही इच्छुकांना भीती आहे. त्यामुळे पक्षाने स्वबळावरच निवडणुका लढविण्यासाठी ते उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP to contest Nanded independently; Congress, Uddhav Sena join forces.

Web Summary : BJP will contest Nanded Municipal Corporation elections solo after alliance talks failed. Congress and Uddhav Sena are joining hands to challenge BJP. MVA is working to consolidate, while MIM and VBA have released candidate lists.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका