शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:13 IST

नांदेड लोकसभा निवडणुकीत मुखेड-कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी ८ ठिकाणी भाजपाला आघाडी तर बेटमोगरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसला आघाडी मिळाली. याबरोबरच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्ह्यात सर्वाधिक ३५ हजार ८८२ मतांची आघाडी दिली.

ठळक मुद्देबेटमोगरा जि.प.गटाने काँग्रेसला तारले मुखेड शहरातही भाजपाला आघाडी

दत्तात्रय कांबळे।मुखेड: नांदेड लोकसभा निवडणुकीत मुखेड-कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी ८ ठिकाणी भाजपाला आघाडी तर बेटमोगरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसला आघाडी मिळाली. याबरोबरच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्ह्यात सर्वाधिक ३५ हजार ८८२ मतांची आघाडी दिली.जांब(बु.) गटामध्ये बुथ क्र.१११ ते ११५ या पाच बुथवर अशोकराव चव्हाण यांना १२५५ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना १३४१ मते मिळाली़ तर प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना ३५६ मते मिळाली. सावरगाव(पी) गटामध्ये बुथ क्र.१८४ ते १८७ या चार बुथवर अशोकराव चव्हाण यांना ७७४ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना ८२६ मते तर प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना २४४ मते मिळाली. यात चिखलीकर यांना चव्हाण यांच्यापेक्षा ५२ मतांची आघाडी आहे. एकलारा गटामध्ये बुथ क्र.२१३ ते २१६ या चार बुथवर अशोकराव चव्हाण यांना ५१२ तर चिखलीकर यांना ८८५ मते व प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना १८० मते मिळाली. यात चिखलीकर यांनी ३६३ मतांची आघाडी घेतली. येवतीमध्ये बुथ क्र.२२६ ते २३० या पाच बुथवर चव्हाण यांना ६६६ तर चिखलीकर यांना ९९० मते व भिंगे यांना २१६ मते मिळाली. यात चिखलीकर यांना चव्हाण यांच्यापेक्षा ३२४ मतांची आघाडी आहे. बाºहाळी गटामध्ये बुथ क्र.२६६ ते २७१ या सहा बुथवर अशोकराव चव्हाण यांना १३०१ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना १६९५ मते मिळाली व भिंगे यांना १५३ मते मिळाली. चिखलीकर यांना चव्हाण यांच्यापेक्षा ३९४ मतांची आघाडी आहे.मुक्रमाबाद गटामध्ये बुथ क्र.३०९ ते ३१६ या आठ बुथवर चव्हाण यांना ९०४,चिखलीकर यांना १८७५ मते मिळाली तर भिंगे यांना ३०४ मते मिळाली. बेटमोगरा गटामध्ये तीन बुथवर अशोकराव चव्हाण यांना ८८७ तर चिखलीकर यांना ४८७ मते मिळाली व भिंगे यांना १७० मते मिळाली. यात चव्हाण यांना चिखलीकर यांच्यापेक्षा ३०० मतांची आघाडी आहे.कंधार तालुक्यातील पेठवडज गटात अशोकराव चव्हाण यांना १४७० तर प्रताप पाटील चिखलीकर यांना १६४४ तर भिंगे यांना १९३ मते मिळाली. कुरळा गटामध्ये पाच बुथवर अशोकराव चव्हाण यांना ८५२ तर चिखलीकर यांना १६२९ मते मिळाली तर प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना ८१५ मते मिळाली.यात चिखलीकर यांना ७७७ मतांची आघाडी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा