शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला चपराक ! फडणवीस सरकारने केलेल्या 'या' नियुक्त्या सुप्रीम कोर्टाने केल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 15:06 IST

भाजपा सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड संदर्भाने खालसा दिवाणच्या चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती.

ठळक मुद्दे राज्य सरकार गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीया निर्णयामुळे तत्कालीन भाजपा सरकारचा उद्देश राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही स्पष्ट झाले

नांदेड : नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाची उपशाखा असलेल्या सचखंड हजुरी खालसा दिवाण (ट्रस्ट)च्या चार सदस्यांची सदस्यता रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यांची संख्या आता १४ वरुन दहावर आली आहे. या निर्णयाचा गुरुद्वारा बोर्डाच्या अस्तित्वावर सध्या तरी कोणताही परिणाम होणार नाही.

भाजपा सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड संदर्भाने खालसा दिवाणच्या चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल देताना राज्य सरकार गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप करु शकत नसल्याचे सांगत गुरुद्वारा बोर्डाचे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे नमुद केले. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप करुन खालसा दिवाणच्या चार सदस्यांचा समावेशाबाबत यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला होता. तोच आदेश सर्वोच्च न्यायालयातही गुरुवारी कायम करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचुड, न्यायमूर्ती जोसेफ आणि न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सदस्यत्व रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध खालसा दिवाणच्या चार सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते.  ३१ जुलै रोजी गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य मनजितसिंह यांनी ही याचिका द्नाखल केली होती. गुरुद्वारा बोर्डाचे चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द असतानाही गुरुद्वारा बोर्डाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला होता. ज्याद्वारे खालसा दिवाणच्या सदस्यांच्या अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोपही मनजितसिंघ यांनी केला होता. या प्रकरणात गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवताना सचखंड हजुरी खालसा दिवाणच्या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला.

भाजपला चपराक तत्कालीन मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात गुरुद्वारा बोर्डावर चार सदस्यांची नियुक्ती केली होती़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तत्कालीन भाजपा सरकारचा उद्देश राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही स्पष्ट झाले असून, ही भाजपालाही चपराक असल्याचे बोलले जात आहे़

टॅग्स :NandedनांदेडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय