शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नांदेडमधील पोटनिवडणुकीत भाजपाला भोपळा, काँग्रेसचा मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 15:47 IST

जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 11 (ड) मध्ये काँग्रेसचे

नांदेड - जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 जागा जिंकून काँग्रेसने सहजच विजय मिळवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. नांदेडमधील या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीचा प्रभाव जाणवला असून भाजपाला फटका बसला आहे.  

जिल्ह्यातील नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 11 (ड) मध्ये काँग्रेसचे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार 1866 मतांनी, धर्माबाद नगर परिषदेच्या वार्ड क्र. 2 (अ) मध्ये काँग्रेसच्या कविता नारायण बोलमवाड 229 मतांनी तर व़ार्ड क्र. 4 (अ) मधून काँग्रेसचेच सायारेड्डी पोशट्टी गंगाधरोड 466 मतांनी विजयी झाले आहेत. तसेच, हिमायतनगर नगर परिषदेच्या वार्ड क्र. 13 मधून काँग्रेसच्या अजगरी बेगम अ. रहेमान 341 मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. 1 मध्ये काँग्रेसचे बोईनवाड हणमंत आनंदराव 207 मतांनी विजयी झाले आहेत. बिलोली नगर परिषदेच्या वार्ड क्र. 5 (अ) मध्ये काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार यांना 70 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसने 5 जागांवर विजय मिळवला असून उर्वरीत एका जागेवर अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. काँग्रेसला मिळालेल्या या यशामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा प्रभाव राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्येही होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा