शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:03 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही काम केले नाही़ महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़

ठळक मुद्देमुदखेडमध्ये सभा अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन

मुदखेड : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही काम केले नाही़ महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़ हे सरकार यापुढेही काही करेल, असा विश्वास आता खुद्द जनतेमध्येच राहिला नसल्याने राजस्थान, मध्य प्रदेशच नव्हे तर देशभरात भाजपाची ओहोटी सुरू झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़शहरातील भोकर रोडवरील नई आबादी परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगराध्यक्ष मुजिब अन्सारी जहांगीरदार, उपाध्यक्ष बालाजी गोडसे, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, गटनेते माधव कदम, श्याम चंद्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ नोटबंदीचा शासनाचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे़ नोटबंदी जाहीर करताना त्यामुळे दहशतवाद संपेल असा दावा शासनाने केला होता़ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोजन केले़ दुसरीकडे देशाचे संरक्षण करणारे जवान दररोज शहीद होत आहेत़ दहशतवाद तर थांबलाच नाही, उलट त्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढल्याचे सांगत याला सर्वस्वी केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले़ शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू अशा वारंवार घोषणा सरकारकडून केल्या जातात़ प्रत्यक्षात शेतकºयांची अवस्था या सरकारच्या काळात दयनीय झाली आहे़ सुमारे १२ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ मात्र त्यानंतरही सरकारला जाग येत नसल्याचे सांगत शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिक येणाºया निवडणुकीत या सरकारला धडा शिकवतील, असा विश्वासही खा़चव्हाण यांनी व्यक्त केला़ मोदी सरकारच्या दबावामुळेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला राजीनामा द्यावा लागल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़मुदखेड शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे़ नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी, स्वच्छतेसह घरकुलाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे़ शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला़ तालुक्याच्या ग्रामीण भागात आमदार निधीतून २० कोटींची तर मुदखेड शहरात १४ कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत येणाºया काळात सर्वांच्या सहकार्याने शहराचा चेहरामोहरा बदलू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़

 

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाElectionनिवडणूक