भाजपा सरकार शेतक-यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:44 AM2018-01-22T00:44:08+5:302018-01-22T00:44:21+5:30

केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

BJP government on farmers' land | भाजपा सरकार शेतक-यांच्या मुळावर

भाजपा सरकार शेतक-यांच्या मुळावर

Next
ठळक मुद्देमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप


लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी / माहूर : केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त उमरी आणि माहूर येथे आयोजित सभांमध्ये ते बोलत होते़ उमरीच्या मोंढा मैदानावर झालेल्या हल्लाबोल मोर्चाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. विक्रम काळे, माजीमंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, नगराध्यक्षा अनुराधा खांडरे, कल्पना पाटील डोंगळीकर, संग्राम कोते पाटील, बसवराज नागराळकर, ईश्वर बालबुद्धे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, भाजपा सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली. आजवर एकाही शेतकºयाच्या खात्यात कर्जाची रक्कम भरण्यात आली नाही. शरदचंद्र पवार यांनी केंद्रात असताना ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली़ परंतु, कसलाच आॅनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती न करता सरसकट कर्जमाफी दिली. नव्याने निर्माण झालेले तेलंगणा राज्य शेतकºयांना २४ तास मोफत वीज देण्याची घोषणा करते़ परंतु, राज्य निर्मितीला ५७ वर्षे पूर्ण होवून महाराष्ट्रात अद्याप आठ तास वीज बरोबर मिळत नाही. उलट हे सरकार विजेचे कनेक्शन तोडायला निघाले. आम्ही गोदावरी नदीवर नाथसागरपासून बाभळीपर्यंत १२ बॅरेजेस बांधले. नांदेड जिल्ह्यात या भाजपा सरकारने एकही धरण बांधले नसल्याचा आरोप पवार यांनी केला़ महिलांवरील अत्याचार वाढले, शिष्यवृत्तीसाठी यांच्याकडे पैसा नाही. एकाही तरुणाला रोजगार दिला नाही. नांदेडमध्ये एकही नवीन कारखाना या सरकारने आणला नाही. सोयाबीन, कापसाला भाव नाही. पीकविम्याचे पैसे देण्यासाठी सरकार चालढकल करीत आहे. एकंदरीत शेतकºयांच्या कुठल्याच प्रश्नावर भाजप सरकार गंभीर नसून केवळ फसव्या जाहिराती व पोकळ आश्वासने देवून महाराष्टÑातील जनतेला गाजर दाखविले असा आरोप पवारांनी केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर टीका करताना राज्यात १४०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकार अनेकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत असून सामान्य माणसाला जगणे कठीण झाल्याचे सांगितले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, ‘देश बदल रहा है’ म्हणणाºयांना आता महाराष्टÑ बदललल्याचे नक्कीच लक्षात येईल. मंत्रिमंडळातील एकही मंत्री शेतकरी नाही. त्यामुळे त्यांना शेतकºयांचे प्रश्न कळणार नाहीत. यावेळी सभापती शिरीषराव गोरठेकर, ईश्वरराव भोसीकर, राजेश देशमुख, प्रवीण सारडा, तालुकाध्यक्ष मारोतराव कवळे, कैलासराव गोरठेकर, राजेश कुंटूरकर, भास्कर भिलवंडे, जि. प. सदस्या ललिता यलमगोंडे, संगीता जाधव, खाजासेठ कुरेशी, पल्लवी मुंगल, रमेश सरोदे, गणेशराव गाढे उपस्थित होते़ सूत्रसंचालन सदाशिव पुपुलवाड यांनी तर डॉ. विक्रम देशमुख यांनी आभार मानले.

उद्धव ठाकरे आमदाराला भीत आहेत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर पूर्वी त्यांचे आमदार उभे राहण्याची हिंमत करीत नव्हते़ आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच आमदारांसमोर थरथर कापत आहेत. शिवसेनेचा आता कसलाच धाक राहिला नसल्याचे सांगत अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.

Web Title: BJP government on farmers' land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.