शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

बिलोली तालुक्यात शिक्षकांचे पगार परस्पर उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:41 IST

बिलोली तालुक्यातील बिजूर येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी परस्पर उचलून अपहार केल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे.

ठळक मुद्देगुन्हे दाखल करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

नांदेड : बिलोली तालुक्यातील बिजूर येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी परस्पर उचलून अपहार केल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे.बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ बिजूर या संस्थेच्या अशोक प्राथमिक विद्यालय कुंडलवाडी, सत्य साईबाबा प्राथमिक विद्यालय बिलोली आणि प्राथमिक शाळा बिजूर अशा तीन शाळा आहेत. या शाळामधील शिक्षकांचे त्यांना मिळणारे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी जमा न करता शिक्षकांच्या सदर पगाराची रक्कम परस्पर उचलून शिक्षकांची फसवणूक केली आहे. याचे पुरावे संबंधित शिक्षकांसह शिक्षण विभागाकडे असल्याचे नमुद करीत सदरची बाब गंभीर दखलपात्र गुन्हा असल्याने या प्रकरणी आपले स्तरावरुन संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याबाबत आदेश देण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षकांना दिली आहे.सदर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेला शिक्षक हा स्वत: पोलिस ठाण्यात फिर्याद देवू शकतो. तो त्याचा अधिकार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाची फिर्याद घेवून गुन्हा दाखल करावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.दरम्यान, सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिका-यांनी बिलोली गटशिक्षण अधिका-यांना संबंधित शाळामध्ये जावून शिक्षकांची हजेरीपत्रकावर नाव व सही घेवून त्यांना कार्यभार देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. संस्थेच्या तिन्ही शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापक व संस्थाध्यक्ष हे हजेरी पटावर सही करु देत नाहीत. त्यांना शिकविण्याचा कार्यभार देत नाहीत. त्यांचे वेतन काढत नाहीत. याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाने यापूर्वीही आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे नमुद करीत गटशिक्षणाधिका-यांनी आता स्वत: ही कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिका-यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.प्रशासक नियुक्तीचीही केली शिफारससदर शिक्षण संस्था व संचालक शासनाच्या नियम व कायद्यानुसार काम करीत नाहीत. या पदाधिका-यांकडून शिक्षण खात्याने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. याबरोबरच संस्थेतील गैरकारभार व गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात असल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरुन स्पष्ट होत असल्याचे नमुद करीत सदर संस्था व शाळेचा कारभार नियमाप्रमाणे चालविण्यासाठी या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याची शिफारस वजा विनंती शिक्षणाधिकाºयांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षक