बिलोली तालुक्यात मुख्यमंञी ग्रामसडक योजनेच्या कामाची प्रतवारी घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST2021-02-21T04:34:15+5:302021-02-21T04:34:15+5:30
बिलोली- मुख्यमंञी ग्राम सडक योजनेत बांधकामाचा कालावधी वर्षभराचा असून त्यानंतर लगेच त्याच कंञाटदाराकडे ५ वर्षे दुरुस्तीचे कामाची तरतुद आहे.माञ ...

बिलोली तालुक्यात मुख्यमंञी ग्रामसडक योजनेच्या कामाची प्रतवारी घसरली
बिलोली- मुख्यमंञी ग्राम सडक योजनेत बांधकामाचा कालावधी वर्षभराचा असून त्यानंतर लगेच त्याच कंञाटदाराकडे ५ वर्षे दुरुस्तीचे कामाची तरतुद आहे.माञ सदर रस्त्याचे काम होताच कंञाटदार फिरकेना झाल्याने अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बिलोली तालुक्यातील रस्त्यांची चौकशी करुन संबंधित कंञाटदार विरुध्द कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. बिलोली तालुक्यातील अधिक रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद सा.बां.विभागाच्या अखत्यारीत येत असुन या विभागांकडे अत्यल्प मनुष्यबळ आणि निधीची कमतरता त्यामुळे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने जवळपास सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली,त्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणा-या वाहन चालकांना कमालीचा ञास सहन करावा लागत आहे.मुख्यमंञी ग्राम सडक योजनेस सुरुवात करण्यात आली.या योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे कामे करण्यात आली पण बांधकाम कालावधीनंतर त्याच कंञाटदाराकडे दुरुस्तीचे काम सोपविण्यात आल्याने रस्त्याची प्रतवारी घसरल्याने अनेक रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही परिस्थिती 'जैसे थे' असल्याचे तालुक्यात वास्तव दिसुन येत आहे. सदर निकृष्ट कामांची चौकशी करुन संबंधित गुत्तेदारांचा परवाना काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष दिलीप उत्तरवार यांनी केली आहे.