शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! आणीबाणी काळातील महाराष्ट्रीयन बंदीवानांचा होणार शासकीय गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:43 IST

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या राज्यातील ३,८१३ जणांना दोन महिन्यांचे मिळणार मानधन

नांदेड : आणीबाणीच्या काळात ज्या महाराष्ट्रीयन व्यक्तींनी बंदिवास भोगला आहे त्या सर्वांना नूतन वर्षाच्या प्रारंभी दोन महिन्यांचे मानधन देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्याचा निर्णय राज्य सरकारने २२ डिसेंबर रोजी घेतला आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात सविस्तर अध्यादेश जारी केला आहे. आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तत्कालीन सरकारच्या कायदेशीर कार्यवाहीमुळे तुरुंगवास भोगावा लागला. या सर्व लोकशाहीप्रेमींचा सन्मान व यथोचित गौरव करण्यासाठी त्यांच्या तुरुंगवास कालावधीनुसार मानधन देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या मानधनाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारद्वारे २७ जून २०२५ रोजी घेण्यात आला आहे.

आणीबाणी काळातील बंदिवानांची जिल्हानिहाय संख्यामुंबई शहर ३९, मुंबई उपनगर ११७, ठाणे १२६, पालघर ११२, रायगड ४०, रत्नागिरी ७०, सिंधुदुर्ग ४३, नाशिक ७८, जळगाव १७४, धुळे ३५, नंदुरबार २९, अहिल्यानगर १३३, पुणे ५०४, सातारा ६३, सांगली ८२, सोलापूर ६२, कोल्हापूर ७६, छत्रपती संभाजीनगर १४७, जालना ५६, बीड ५६, नांदेड १०३, हिंगोली १४८, परभणी ३१, लातूर १०६, धाराशिव २७, अमरावती ८३, बुलढाणा ४४७, यवतमाळ ६९, अकोला ८९, वाशिम १०, नागपूर ३९९, वर्धा ११४, भंडारा २५, गोंदिया २१ आणि चंद्रपूर ९९.

तुरुंगवास भोगणारे एकूण ३८१३आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या एकूण ३,८१३ जणांसाठी जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकूण २१ कोटी २० लाख ७६ हजार ८०३ रुपये निधी राज्य शासनातर्फे देण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या सर्वांना तत्काळ मानधन अदा करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी व संवितरण अधिकारी यांची राहील, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Honor Emergency-Era Detainees with Financial Aid

Web Summary : Maharashtra government will honor those jailed during the Emergency with financial aid. Two months' allowance totaling ₹21.2 crore will be distributed to 3,813 individuals across districts in January and February 2026. District collectors will oversee immediate disbursal.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMarathwadaमराठवाडा