डांबरात बड्या कंत्राटदाराचे हात काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:14 IST2018-12-25T00:13:55+5:302018-12-25T00:14:36+5:30
शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता खाजगी व्यक्तीकडून डांबर खरेदी करीत रस्त्यांची बोगस कामे करण्यात नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर आहे़

डांबरात बड्या कंत्राटदाराचे हात काळे
नांदेड : शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता खाजगी व्यक्तीकडून डांबर खरेदी करीत रस्त्यांची बोगस कामे करण्यात नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर आहे़ डांबर घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे़ परंतु,अद्यापही अनेक मोठे कंत्राटदार यातून मोकळेच असल्याची माहिती आ़प्रशांत बंब यांनी दिली़
एका कार्यक्रमानिमित्त आ़ बंब हे नांदेडात आले होते़ आ़बंब यांनीच हे प्रकरण उघडकीस आणले होते़ नांदेडात या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन कंत्राटदारांना नुकताच जामीन मिळाला आहे़ तर तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी, फरार असलेले तीन कंत्राटदार पोलिसांना सापडलेच नाहीत़ विशेष म्हणजे, हे कंत्राटदार नांदेडातच बिनदिक्कतपणे फिरत असल्याची माहिती हाती आली आहे़ त्याचबरोबर चीनकडून डांबर खरेदी करणाऱ्या मुंबईतील व्यापाºयाकडून नांदेडातील डांबरशेठ यांचे लागेबांधेही आतापर्यंत उघड झाले नाहीत.
या डांबरशेठकडून नांदेडातील अनेक बड्या कंत्राटदारांनी डांबर खरेदी केले आहे़ त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून डांबरशेठच्या डांबरामुळे रस्त्यांची काही दिवसांतच चाळणी झाल्याची उदाहरणेही समोर आहेत़ परंतु, डांबर खरेदी करणारे अन्य कंत्राटदार अद्यापही मोकळेच आहेत़ त्याचबरोबर डांबरशेठ आणि घोटाळ्यात मदत करणाºया अधिकाºयांवरही कोणतीही कारवाई झाली नाही़ त्यामुळे डांबराचा हा सर्व तपासच संशयाच्या भोव-यात सापडला आहे़
२००८ मध्ये गुरु-त्ता-गद्दीच्या काळात आणि त्यानंतरही नांदेडात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे करण्यात आली होती़ त्यामुळे या घोटाळ्यात राज्यात नांदेड अव्वल ठरले आहे़ हे प्रकरण अद्याप संपले नसून या घोटाळ्यासाठी नांदेडच्याच अधिकाºयांनी प्रोत्साहन दिले आहे़