भोंदूबाबासह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST2018-02-16T00:02:49+5:302018-02-16T00:03:41+5:30
पत्नीला झालेली बाहेरबाधा घालण्यासाठी भोंदूबाबाच्या मदतीने पत्नीच्या डोक्यावर लिंबू कापणा-या बाबासह सासरच्या मंडळीविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याप्रमाणे भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे़

भोंदूबाबासह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पत्नीला झालेली बाहेरबाधा घालण्यासाठी भोंदूबाबाच्या मदतीने पत्नीच्या डोक्यावर लिंबू कापणा-या बाबासह सासरच्या मंडळीविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याप्रमाणे भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे़
शहरातील स्नेहनगर वसाहतीत राहणा-या या फिर्यादी महिलेचा २०१३ मध्ये औरंगाबाद येथील तरूणाशी विवाह झाला़ यानंतर जवळपास आठ महिने त्यांचा संसार सुरळीत चालला़ त्यातच सदर महिलेच्या स्वभावात, वागण्यात बदल झाल्याची तक्रार पतीसह सासरच्या मंडळींकडून करण्यात येऊ लागली. यातूनच पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला दाखविण्यासाठी एका वैद्य बाबाकडे नेले.
बाबानी विवाहितेला पाहून तिला बाहेरची बाधा झाली असून मी सांगितल्याप्रमाणे करा, असे सूचवित लिंबू, अंगारा देवून मंत्र मारला. मात्र बाबांच्या या कृत्यानंतर सदर विवाहित महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. प्रकृती खालावल्याने सदर महिलेला औरंगाबादवरुन नांदेड येथे माहेरी आणून सोडण्यात आले. दरम्यान, २१ जानेवारी रोजी महिलेचा पती, सासु, सासºयांनी बाबाला सोबत घेवून नांदेड येथील फिर्यादी महिलेच्या डोक्यावर लिंबू कापून मंत्रोच्चार केले़ तसेच जीवे मारण्याची धमकी देवून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात सासरची मंडळी आणि बाबावर जादुटोणा विरोधी कायदा कलम ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी़ एस़ गोटके हे तपास करीत आहेत़