भोकरमध्ये सफाई कामगार तरुणाच्या हत्येने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:04 IST2018-06-16T16:04:58+5:302018-06-16T16:04:58+5:30
नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद मधूकर कांबळे (३२) यांची हत्या झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
_201707279.jpg)
भोकरमध्ये सफाई कामगार तरुणाच्या हत्येने खळबळ
भोकर (नांदेड) : नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद मधूकर कांबळे (३२) यांची हत्या झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेले एसटीचे निवृत्त चालक मधूकर कांबळे यांचा मुलगा प्रमोद मधूकर कांबळे (३२) हा नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. तो आपली पत्नी व ४ वर्षाच्या मुलासह शहरातील रशिद टेकडी भागात भाड्याच्या घरात रहात असे. शुक्रवारी दुपारी त्याच्या पत्नीसोबत काही कारणाने वाद झाल्यानंतर पत्नी माहेरी (रावणगाव ता.भोकर) निघून गेली होती.
दरम्यान, शुक्रवारी रात्री १० वाजता शास्त्रीनगरातील घराकडे आई-वडीलांना भेटून प्रमोद बाहेर पडला. त्यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्याचे प्रेत बसस्थानकाच्या शेजारी ओसाड झाडे झुडपे असलेल्या कोरड्या नाल्यात आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला.