भोकरच्या जवानाचे भारत -चीन सीमेवर ह्रदय विकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:49 IST2017-08-24T19:49:17+5:302017-08-24T19:49:26+5:30
फ्रफुल्लनगर येथील रहिवासी असलेले सैन्यातील जवान नरसीग शिवाजी जिल्हेवाड यांचे भारत- चिन सीमेवर कर्तव्य बजावताना ह्रदय विकाराने निधन झाले.

भोकरच्या जवानाचे भारत -चीन सीमेवर ह्रदय विकाराने निधन
भोकर (नांदेड ) ,दि.२४ : फ्रफुल्लनगर येथील रहिवासी असलेले सैन्यातील जवान नरसीग शिवाजी जिल्हेवाड यांचे भारत- चिन सीमेवर कर्तव्य बजावताना ह्रदय विकाराने निधन झाले. त्याचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी भोकर शहरात दाखल होणार असल्याची प्रशासकीय माहिती मिळाली आहे.
भारतीय तीबेट पोलीस दलात देश रक्षणात कार्यरत असलेले जवान नरसींग शिवाजी जिल्हेवाड (वय ४२) यांची अरुणाचल प्रदेश मधील किनीन येथे नियुक्त होती. दरम्यान,चीन च्या सीमेवर कर्तव्यावर असताना मंगळवारी (दि. २२ ) त्यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. ते पत्नी पुजा, ३ मुले व १ मुलगी अशा परिवार घेवून अरुणाचल प्रदेशातील किनीन येथे मुख्यालयी राहत होते.
शुक्रवारी सायंकाळी प्रफुल्लनगर येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव येणार असून शनिवारी सकाळी अंत्यविधी होणार आहे.