भोकर येथे करणीच्या संशयावरून एकाचा खून, ३ संशियत आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 16:00 IST2017-09-23T16:00:03+5:302017-09-23T16:00:46+5:30
भोकर तालुक्यातील नांदा (प.म्है.) शिवारात बुधवारी (दि. २०) रोजी एकाचा मृतदेह आढळला होता. भोकर पोलीसात याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतू, मृताच्या वडिलांनी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन शनिवारी पहाटे अज्ञात मारेक-या विरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवत २४ तासात ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

भोकर येथे करणीच्या संशयावरून एकाचा खून, ३ संशियत आरोपी अटकेत
नांदेड, दि. 23 : भोकर तालुक्यातील नांदा (प.म्है.) शिवारात बुधवारी (दि. २०) रोजी एकाचा मृतदेह आढळला होता. भोकर पोलीसात याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतू, मृताच्या वडिलांनी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन शनिवारी पहाटे अज्ञात मारेक-या विरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवत २४ तासात ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सुत्राकडून प्राप्त माहिती अशी की, किनवट तालुक्यातील परोटी येथील रहिवासी गजानन सीताराम गुटलवाड वय ३५ हा नांदा (प.म्है) ता.भोकर शिवारात बुधवारी (दि.२०) मृतावस्थेत आढळून आला होता. तेव्हा येथील पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मयताचे वडील सीताराम खंडोजी गुटलवाड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन भोकर पोलीसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर तपासचक्र फिरवत पोलिसांनी सतोष आनंदराव दहिलोड (२४), रोहिदास यरन्ना आनेबोईनवाड (४९), हनमंलु आनंदराव बोराडे (४०) सर्व रा.नांदा (म्है.प.) यांना ताब्यात घेतले.
शवविच्छेदनातून झाला खुनाचा उलगडा
शुक्रवारी (दि. २२) डॉक्टरांच्या शवविच्छेदनाच्या अहवाला नुसार हा मृत्यू आकस्मिक नसून यांचा खून करण्यात आल्याचा अहवाल प्राप्त झाला. ल्यावरुन येथील पोलीसांनी तपासचक्र गतीमान करुन प्रथम मयतांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यानंतर भोकरचे पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ यांनी घटनास्थळी जावून ग्रामस्थांची चौकशी केली.
यात सुरवातीला कुणीही ग्रामस्थ बोलण्यास तयार नव्हते. तेव्हा गावातील काही बालकांना विस्वासात घेवून पोलिसांनी विचारणा केली. तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. सध्या पोलीसांनी ३ आरोपींना संशयीत म्हणून ताब्यात घेतले असले तरी यात आणखी वाढ होवू शकते असे पो.नि. पडवळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पुढील तपास सपोनि सुरेश भाले करीत आहेत.