दानशूर धावले, पण आठ दिवसांनीही औषध मिळेना
By शिवराज बिचेवार | Updated: October 10, 2023 07:55 IST2023-10-10T07:52:22+5:302023-10-10T07:55:00+5:30
काही दानशुरांनी दहा लाखांहून अधिकची औषधी दान दिली आहेत...

दानशूर धावले, पण आठ दिवसांनीही औषध मिळेना
नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ जणांचे मृत्यू झाले होते. या घटनेमुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असून मंत्र्यांनीही औषधांचा मुबलक साठा असल्याचा दावा केला. परंतु, प्रत्यक्षात आठ दिवसांनंतरही रुग्णांना किरकोळ स्वरूपाची औषधीही विकत आणावी लागत असल्याचे वास्तव सोमवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. काही दानशुरांनी दहा लाखांहून अधिकची औषधी दान दिली आहेत.
शस्त्रक्रिया विभागातही नाहीत औषधे
शस्त्रक्रिया विभागातील रुग्णांच्या नातेवाइकांना आयव्ही सेट, डीनाप्लास्ट, कोहोन, प्लास्टिक ॲपरॉन, सर्जिकल ब्लेड यासह इतर औषधी बाहेरून आणावी लागली. बीपी, शुगर, टीटी, किडनी यासारख्या गोळ्याही नसल्याचे दिसून आले.