शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नामच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना डॉक्टरांतर्फे नि:शुल्क सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:09 IST

जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़ त्यासाठी नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉक्टरांची बैठकही घेण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़ त्यासाठी नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉक्टरांची बैठकही घेण्यात आली आहे़नाम फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यात अनेक कामे सुरु आहेत़ त्यासाठी स्वयंसेवी संघटनांकडून भरभरुन मदत करण्यात येत आहे़ त्यात आता नांदेडातील नामवंत डॉक्टरांनीही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी निर्धार केला आहे़ यासंदर्भात इमा भवन येथे बैठक घेण्यात आली़ या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शहरातील नामवंत डॉक्टर्स, रुग्णालये नि:शुल्क सेवा पुरविणाऱ आहेत. जिल्हाधिकाºयांच्या मदतीने तालुकानिहाय दुर्गम व अतिगरजेच्या ठिकाणी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ रुग्णांची रक्त तपासणी, दंत तपासणी, समुपदेशन व जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ डॉ़ आश्विन लव्हेकर यांच्या पुढाकाराने टेलीमेडीसीनद्वारे बहिरेपणा तपासणी व निदान करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे़सर्वसामान्य रुग्णांसाठी जेनेरिक औषधींची उपलब्धता करुन देण्याची जबाबदारी डॉ़ हंसराज वैद्य व डॉ़आश्विन तळणीकर यांनी घेतली आहे़ तर डॉ़ येळीकर यांच्या रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची आरोग्यविषयक जबाबदारी आधारचे डॉ़ प्रदीप जाधव, डॉ़सुरेश कदम, डॉ़ संजय कदम यांनी घेण्याचे मान्य केले आहे़ तर डॉ़दत्ता मोरे हे दंत चिकित्सा व निदान करणार आहेत़ अशाप्रकारे शहरातील नामवंत डॉक्टरांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे़यावेळी झालेल्या बैठकीला नामचे जिल्हा समन्वयक डॉ़ अशोक बेलखोडे, प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार, आयएमचे अध्यक्ष डॉ़सुरेश कदम, नामचे सल्लागार दीपनाथ पत्की, डॉ़ बी़ जी़ मोरे, राठोड, पांडुरंग कंधारे, प्रा़ उमेद महाजन, गायकवाड, राजकुमार जाधव यांची उपस्थिती होती़दरम्यान, नामच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांवर स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने शिबिरे चालविण्यात येतात़ त्याला आता तज्ज्ञ डॉक्टरांची जोड मिळणार आहे़नामच्या पदाधिकाºयांसोबत इमाची बैठक घेण्यात आली आहे़ या बैठकीत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा देण्यासाठी अनेक नामवंत डॉक्टर पुढे आले आहेत़ याबाबत आणखी एक बैठक होणार असून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविणार असल्याची माहिती इमाचे अध्यक्ष डॉ़ सुरेश कदम यांनी दिली़

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरdoctorडॉक्टरfarmer suicideशेतकरी आत्महत्या