शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने माहुरचे शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 18:59 IST

श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी ...

ठळक मुद्देएकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा खर्च अंदाजे २५ हजार रुपयांच्या आसपास आहे़यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते़ मात्र सध्या प्रतिक्विंटल ४३५० ते ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे़

श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी लागत आहे़ अशातच शासनाने कापसाला जाहीर केलेला हमीभाव अत्यंत कमी व खाजगी व्यापारीही अल्पदर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़

एकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा खर्च अंदाजे २५ हजार रुपयांच्या आसपास आहे़ यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते़ मात्र सध्या प्रतिक्विंटल ४३५० ते ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे़ याची आकडेवारी काढली तर शेतक-याच्या हाती काहीच लागत नाही़ त्यामुळे शेतकरी संतापला असून कापसाला कमीत कमी ५ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी होत आहे़

मजुरांचा अभावमाहूर तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांचा अभाव असल्यामुळे बाहेर गावातून कापूस वेचणीसाठी मजूर आणावे लागत आहेत़ त्यांना प्रती ७ रुपये किलो दराने भाव द्यावा लागत आहे़ मजुरांना आणणाºया गाडीच्या खर्चाचा अधिकचा भर पडत असल्याने पुढील वर्षी कापसाचे पीक घ्यावे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे़

वन्यप्राण्यांचा हैदोसएकीकडे आस्मानी संकटांना तोंड द्यावे लागत असताना वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकºयांना हैराण केले आहे़ रोही, डुक्कर, हरीण हे वन्यप्राणी कापूस पिकाला जमीनदोस्त करीत आहेत़ त्यामुळे उभे पीक खाली पाडून नासधूस करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़

दलाल सक्रीयशेतक-याच्या थेट दरवाजापर्यंत जावून त्यांना फूस लावून व्यापा-यांकडून शेतक-यांची मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे़ शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी व्यापारी करीत असून यात अनेक दलाल सक्रीय आहेत़ अशा प्रकारची खरेदी न करण्याचे आदेश सरकारने दिले होते़ मात्र त्याला न जुमानता व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय चालू ठेवला आहे़शासनाने जाहीर केलेल्या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही़ त्यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे़ शासनाने विचार करून कमीत कमी ५ हजार रुपये भाव द्यावा - दत्ता बनसोडे, शेतकरी, वानोळा.

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसNandedनांदेड