शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

दुरुस्तीसाठी निधी नसल्याने कयाधू कालवा झाला कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:39 IST

हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवदान ठरलेला कयाधू कालवा सध्या कालबाह्य ठरल्यामुळे वारंवार फुटून पाणी वाया जात आहे़

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्यामुळे कालव्याच्या शेवटपर्यंत पाणी पोहचत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही़

- सुनील चौरे

हदगाव (नांदेड ) :  हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी जीवदान ठरलेला कयाधू कालवा सध्या कालबाह्य ठरल्यामुळे वारंवार फुटून पाणी वाया जात आहे़ वरिष्ठ पातळीवरून दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्यामुळे शेवटपर्यंत पाणी पोहचत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही़

सन १९७६ ला सुरु झालेल्या या ९० कि़मी़ लांबीच्या कालव्याचे काम अद्यापही शेवटपर्यंत पूर्ण झाले नाही़ त्याकाळी शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांना कालव्याद्वारे पाणी मिळाले़ हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील शेकडो शेतकरी कुटुंबे या हक्काच्या पाण्यामुळे समृद्ध झाली आहेत़ अनेक शेतकऱ्यांची जमिनी या कालव्यामध्ये गेली़ त्यांचा मावेजा अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाला नाही़ परंतु शेतीला पाणी मिळाले आहे़ या आशेने शेतकरी गप्प आहेत़ ४० वर्षापूर्वाी झालेल्या कामाची कालबाह्यता संपली आहे़ तरीही त्याच साहित्यावर हा कालवा सुरू आहे़ आजघडीला पाण्याची किंमत सोन्यासारखी झाली़

 दरवर्षी पावसाळी हंगाम, रबी हंगामासाठी तीन-चार पाणीपाळ्या याच कालव्याद्वारे शेतकऱ्यांना मिळतात़ त्यानंतर कमी पाऊस झाल्याने आरक्षित केलेले पाणी जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात येते़ गत चार वर्षापासून याच आरक्षित पाण्यावर दोन्ही तालुक्याची तहान भागत आहे़ परंतु पाण्याचा प्रवाह वाढविला की कालवा जागोजागी फुटतो़ यावर्षी दोन-तीन महिन्यात सात ठिकाणी कालवा फुटला़ १३ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याची क्षमता असून केवळ ९ क्युसेस पाण्याचा विसर्ग करता येतो़ यामुळे हेडपासून टेलपर्यंत पाणी जाण्यास विलंब होतो़ कालवा फुटला की पाणी बंद करून तात्पुरते काम केले जाते व पुन्हा पाणी सोडण्यात येते़ यामुळे वेळ चुकून मिळालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामाचे नुकसान होते व त्याचा परिणाम पाणीकर वसुली करताना होतो़

जागोजागी वाढले मोठे वृक्षजागोजागी मोठमोठी वृक्ष वाढली आहेत़ आस्तरण मोडल्या आहेत़ मोठमोठ्या छिद्रे पडल्यामुळे ३-४ क्युसेस पाणी वाया जाते़ काही विशिष्ट गावामध्ये दरवर्षी शेतकरी कालवा फोडतात़ राजकीय बळाचा वापर करून कर्मचारी, अधिकारी यांना धमकावतात़ त्यामुळे पाण्याची चोरी होते़ यासाठी प्रतिबंध करण्यासाठी कडक कारवाई करणे गरजेचे आहे़ या कालव्याचे काम हेडपासून टेलपर्यंत करणे गरजेचे आहे़ त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे़ वरिष्ठ मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ स्थानिक आमदार, खासदार यांनी हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय उचलून धरणे गरजेचे आहे़ 

टॅग्स :WaterपाणीriverनदीNandedनांदेड