वीज कापणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST2021-03-23T04:19:13+5:302021-03-23T04:19:13+5:30

रवी ताराचंद थोटे हे महावितरणमध्ये साहाय्यक अभियंता आहेत. ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन २१ मार्च रोजी मुखेडच्या हेडगेवार चौकात गेले ...

Beating a power cut employee | वीज कापणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण

वीज कापणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण

रवी ताराचंद थोटे हे महावितरणमध्ये साहाय्यक अभियंता आहेत. ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन २१ मार्च रोजी मुखेडच्या हेडगेवार चौकात गेले होते. या ठिकाणी थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा त्यांनी तोडला. त्याचा राग मनात धरून ग्राहकाने थोटे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पो.उप.नि. कुंभारे हे करीत आहेत.

ट्रॅक्टर चालकावर हल्ला

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे किरकोळ कारणावरून एका ट्रॅक्टर चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना २१ मार्च रोजी घडली. सुनील बाबूराव गायकवाड हे चिकनच्या दुकानासमोर उभे असताना आरोपी त्या ठिकाणी आला. दिवसभर कुठे गेला होता, असे म्हणून त्याने गायकवाड यांच्याशी वाद घालून मारहाण केली. या प्रकरणात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Beating a power cut employee