पूर्व वैमनस्यातून कुटुंबाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST2021-04-29T04:13:43+5:302021-04-29T04:13:43+5:30
ग्राम विकास अधिकार्याला शिवीगाळ नांदेड- गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची तोडलेली लाईन पाहण्यासाठी गेलेल्या ग्राम विकास अधिकार्याला शिवीगाळ केल्याची घटना मुदखेड ...

पूर्व वैमनस्यातून कुटुंबाला मारहाण
ग्राम विकास अधिकार्याला शिवीगाळ
नांदेड- गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची तोडलेली लाईन पाहण्यासाठी गेलेल्या ग्राम विकास अधिकार्याला शिवीगाळ केल्याची घटना मुदखेड तालुक्यातील मेंडका येथे घडली. या प्रकरणात पती-पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मेंडका येथील पाणी पुरवठ्याची लाईन तोडण्यात आली होती. २६ एप्रिल रोजी ग्राम विकास अधिकारी शिवाजी देवराव गिराम हे त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पांडूरंग चांदू निखाते आणि त्यांची पत्नी हे दोघे जण त्या ठिकाणी होते. यावेळी पती-पत्नीने तुम्ही चांगले कामे करीत नाहीत, गावात नोकरी कसे करता ते पाहतो असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणात मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जुगार अड्डयावर पोलिसांची धाड
रामतिर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कांडाळा शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारली. २६ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात खाकीबा सुर्यवंशी, माधव म्हेत्रे, साहेबराव सुर्यवंशी, सुभाष चिठेवाड, गिरधारी सुर्यवंशी, खादर मगदूमसाब, रहिम देसाई यांच्या विरोधात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
बारड येथे तीन हजारांची दारु पकडली
मुदखेड तालुक्यातील बारड येथे अवैधरित्या विक्री करण्यासाठी बाळगलेली तीन हजार रुपयांची दारु पोलिसांनी पकडली आहे. २७ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अमृत दत्तराव पवार याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर फुलवळ येथे देशी दारुच्या४१ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात कंधार ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दारुसह दोन लाखांचा माल जप्त
नांदेड- शहरातील बांधकाम विभागाच्या वसाहतीजवळ पोलिसांनी महिंद्रा मॅक्स या वाहनात अवैधरित्या नेण्यात येणारी दारु पकडली. यावेळी वाहनासह १ लाख ९३ हजारांचा माल जप्त करण्यात आला. २७ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.
एम.एच.२२ डी. २२९६ या क्रमांकाच्या महिंदा मॅक्स गाडीतून देशी दारुची वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीजवळ ही गाडी अडविली. यावेळी गाडीत देशी दारुचे१५ बॉक्स आढळून आले. त्यामध्ये ४३ हजार रुपयांची दारु होती. पोलिसांनी दारु आणि महिंद्रा मॅक्स जीप जप्त केली. या प्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.