दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:08+5:302021-04-19T04:16:08+5:30
नारळ विक्रेत्यास मारहाण नांदेड : नारळ पाणी पिल्यानंतर त्याचे पैसे देण्यास नकार देणाऱ्या आरोपीने नारळ पाणी विक्रेत्यास कतीने वार ...

दोघांना मारहाण
नारळ विक्रेत्यास मारहाण
नांदेड : नारळ पाणी पिल्यानंतर त्याचे पैसे देण्यास नकार देणाऱ्या आरोपीने नारळ पाणी विक्रेत्यास कतीने वार करून जखमी केल्याची घटना कंधार शहरातील महाराणा प्रताप चौकात ८ एप्रिल रोजी सायंकाळी पडली. सय्यद मोहसीन सय्यद मोईन असे नारळ पाणी विक्रेत्यांचे नाव असून तो मारहाणीत गंभीर जखमी झाला.
जुगार अड्ड्यावर धाड
नांदेड : माळटेकडी ते शंकरराव चव्हाण चौकदरम्यान रस्त्यावर खेळल्या जात असलेल्या जुगार अड्ड्यावर विमानतळ पोलिसांनी १६ एप्रिल रोजी दुपारी धाड टाकली. या धाडीत नगदी २ हजार २६० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशी दारू जप्त
नांदेड : विनापरवाना देशी दारू बाळगणाऱ्यास उस्माननगर पोलिसांनी १६ एप्रिल रोजी दुपारी ताब्यात घेतले. कंधार तालुक्यातील हाळदा येथील आरोपीच्या घरी दारू ठेवण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी ५ हजार ९६ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली.
रुग्णवाहिकांच्या माहितीसाठी आयुक्तांना पत्र
नांदेड : हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले आहे. यामध्ये नांदेड शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णवाहिकांची माहिती मागविली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण नांदेड शहरात मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. या रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णवाहिकांची माहिती नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्याची त्यांनी मागणी केली आहे.