शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आयुष्याच्या नावेचे कॅप्टन व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:13 AM

अबोल असलेल्या समलिंगी संबंधाविषयी भाष्य करणाºया कॅप्टन... कॅप्टन या एका वेगळ्या विषयाच्या नाटकाने नाट्यस्पर्धेत रंगत भरली होती़ स्वत:च्या आयुष्याचे स्वत: कॅप्टन बना, या अथांग समुद्र्रात आपल्या आयुष्याच्या नावेचा कॅप्टन बनून आपणास निर्णय घेता आला पाहिजे, असा एक असा संदेश देणाºयाला नाटकाला रसिकांनी भरभरुन दाद दिली़

ठळक मुद्देराज्य हौशी नाट्यस्पर्धा : अबोल असलेल्या समलिंगी संबंधावर भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अबोल असलेल्या समलिंगी संबंधाविषयी भाष्य करणाºया कॅप्टन... कॅप्टन या एका वेगळ्या विषयाच्या नाटकाने नाट्यस्पर्धेत रंगत भरली होती़ स्वत:च्या आयुष्याचे स्वत: कॅप्टन बना, या अथांग समुद्र्रात आपल्या आयुष्याच्या नावेचा कॅप्टन बनून आपणास निर्णय घेता आला पाहिजे, असा एक असा संदेश देणाºयाला नाटकाला रसिकांनी भरभरुन दाद दिली़महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दर्जेदार नाटके सादर होत आहेत़ बसनी पंचक्रोशी ग्रंथालय,रत्नागिरीच्या वतीने सोमनाथ सोनवलकर लिखित, मनोहर सुर्वे दिग्दर्शित ‘कॅप्टन... कॅप्टन’ हे नाटक सादर करण्यात आले़आयुष्य जगण्यासंदर्भात अत्यंत साधे स्वप्न घेऊन जगणारी सानिया (मृणाली डांगे) तिचे लग्न नेव्हीत कॅप्टन असलेल्या विक्रांतशी (निशांत जाधव) होते; पण विक्रांत हा समलिंगी आहे़ हे सानियाला लग्नानंतर कळते आणि विक्रांतलाही त्याची जाणीव होते की, सानियाशी लग्न करून तिला सुख देऊ शकणार नाही; पण तो लग्न करतो ते वडिलांच्या आग्रहास्तव़या सर्व गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करतो; पण वडिलांचा दबाव आणि समाजाची मानसिकता यामुळे तो स्वत:च्या आणि सानियाच्या आयुष्याशी खेळतो. तो स्वत:च्या आयुष्याच्या नावेचा कॅप्टन बनू शकत नाही. विक्रांतचे कॅप्टनशी (ओंकार पाटील) असलेले समलिंगी संबंध, सानियाशी वागताना त्याची होणारी घुसमट, सानियाला आपला नवरा समलिंगी आहे, हे कळाल्यावर तिच्या मनात निर्माण झालेला भावनांचा कल्लोऴ कॅप्टनची एका बाजूला जहाजाचा कॅप्टन म्हणून असलेली कणखरता आणि दुसºया बाजूला समलिंगी संबंध जपण्याची आक्रमकता या नाटकातून दाखविण्यात आली आहे़नाटकात कौस्तुभ केळकर, संतोष गार्डी, अमोल जामसुदकर, अजित पाटील, संजय रांगंकर, जयेश शिवलकर, मिथुन पवार, सागर मायंगडे, शुभम शिवलकर, अक्षय शिवगण, प्रथमेश काटकर, साई प्रसादे, स्वानंद मयेकर, समीर बंडबे यांनी भूमिका साकारली.नाटकाची जमेची बाजू म्हणजे प्रवीण धूमक यांनी साकारलेले नेपथ्य वास्तववादी स्वरूपाचे होते़ दोन मजली इमारत आणि जहाज यांचा डोलारा काही सेकंदात बदलत होता. पार्श्वसंगीत- नंदलाल रेळे तर प्रकाशयोजना- संजय तोडणकर, रंगभूषा- प्रदीप पेडणेकर, वेशभूषा- चेताली पाटील, रंगमंच व्यवस्था- ज्योती मुळे, योगेश मांडवकर, तेजस्विनी शेट्टे यांनी सांभाळली.