शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:46 IST

लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़

ठळक मुद्दे४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूरचिखलीकर अन् धोंडगेंच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी

नांदेड : लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले़आ़प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, किवळा साठवण तलावाला मंजुरी देण्यासाठी २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मागणी केली होती़ त्यानंतर २० मे २०१८ रोजीच्या बैठकीत या साठवण तलावाचा प्रस्ताव मंजूर करुन सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ परंतु, साठवण तलावाचा खर्च महापालिका प्रशासनाने करावा, अशी अट टाकण्यात आली होती़ परंतु या तलावाचा खर्च करण्याची क्षमता महापालिकेत नसल्याचे पत्र आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले होते़ त्यामुळे या तलावाचे काम रखडले होते़ त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हे काम जलसंपदा विभागा मार्फत करण्यात यावे, अशी मागणी केली होती़ त्यानंतर औरंगाबाद जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते़मुख्य अभियंत्यांनी पंचम सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबतची अट रद्द करुन तलावाचा सर्व खर्च जलसंपदा विभागाने करावा यास मान्यता दिली़ त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत साठवण तलावास मंजुरी देण्यात आली असून ४३ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ अशी माहिती आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली़तर किवळा साठवण तलावाला फडणवीस सरकारने मंजूर दिली अशी खोटी माहिती देवून आ़प्रताप पाटील चिखलीकर हे जनतेची दिशाभूल करीत असून या साठवण तलावाची मंजुरी निविदा आणि कार्यारंभ आदेश मागील आघाडी सरकारच्या काळात आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून निघाले़ अशी माहिती माजी आ़ शंकर धोंडगे यांनी दिली़पत्रपरिषदेत धोंडगे म्हणाले, गोदावरी पात्रातील अंतेश्वर बंधारा व किवळा येथील साठवण तलाव झाल्यास विष्णूपुरीवरील शहराच्या पिण्याच्या पाण्याचा भार कमी होवून विष्णूपुरी पूर्णपणे शेतीसाठी उपयोगात येईल़ या हेतूने आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी घेण्यात आली होती़ त्यामध्ये अंतेश्वर बंधारा पूर्ण झाला़ किवळा साठवणाला पाण्याचा येवा कमी असल्यामुळे पावसाळ्यात विष्णूपुरी जेव्हा ओव्हर फ्लो होते़ त्या काळात इन्फ्लोमधून तलाव भरुन नंतरच्या काळात एमआयडीसी, सिडको, हडको व कृष्णूर एमआयडीसीला वर्षभर पाणी पुरवठा करता येतो़या संकल्पनेतून किवळ्याला १६ मे २०१२ रोजी निविदा मंजुरी व २७ जून २०१३ ला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाला़ भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधीही दिला होता़ असे असताना चिखलीकर मात्र भाजप सरकारचे अपयश लपविण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही धोंडगे यांनी केला आहे़त्यामुळे एवढी वर्षे रखडलेल्या या पुलाला निधी मंजूर होताच विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत़ आगामी काळात हा वाद आणखी वाढत जाणार आहे़

  • आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता लोहा-कंधार मतदारसंघासाठी किवळा साठवण प्रकल्पाचा मुद्दा सर्वांसाठीच महत्त्वाचा झाला आहे़ येत्या काळात माजी आ़शंकर धोंडगे आणि विद्यमान आ़प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाक्युद्ध चांगलेच रंगणार असल्याचे दिसते़
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणPoliticsराजकारण