शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:06 IST

जात पडताळणी करून देते सांगत घेतले १५ हजार रुपये

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता मधुकरराव पोहरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तक्रारदाराने जात पडताळणी कार्यालयात आपल्या मुलाचे अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी दिनांक १३ मार्च २०२५ रोजी ऑफलाइन अर्ज दाखल केला होता. शिवाय याच दिवशी त्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदार आणि पुन्हा आपल्या मुलाचे प्रमाणपत्र ऑनलाइनही दाखल केले होते. यानंतर आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांची त्यांनी भेट घेतली मी काम करत असलेल्या विभागाचे शेजारीच जात पडताळणी भागाचे काम चालते. त्यामुळे तिथे माझी ओळख असून मी तुमचे काम करून देते. परंतु पैसे भरावे लागतील, अशी त्यांनी तक्रारदारांकडे मागणी केली होती. यावेळी २० हजार रुपये टोकन दिल्यास तुमचे काम होईल अन्यथा होणार नाही असेही त्यांनी सांगितले होते. मात्र हे प्रकरण १५ हजारावर रुपयांवर ठरविण्यात आले.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीवरून आज दिनांक ३ जुलै रोजी समाज कल्याण कार्यालय परिसरात सुजाता पोहरे यांचे कक्षात सापळा कारवाई करण्यात आली. ज्यात सुजाता पोहरे आणि १५ हजार रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची अंग झडती घेतली असता पोहरे यांच्याकडे नगदी ५० हजार रुपये आढळून आले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक करीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल मेनका पवार, यशवंत दाबनवाड, ईश्वर जाधव, रमेश नामपल्ली यांच्या पथकाने केली आहे.

दोन महिला तलाठ्यांनंतर प्रकल्प अधिकारी जाळ्यातभ्रष्टाचाराची पाळेमुळे खाेदून काढण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. गत महिनाभरात पोलिस दल, महसूल विभाग त्यापाठोपाठ कामगार अधिकारी व आता समाजकल्याण विभागात यशस्वी सापळा कारवाई केली आहे. १५ दिवसांपूर्वी दोन महिला तलाठ्यांना पथकाने लाच घेताना पकडले होते. त्यापाठोपाठ जिल्हा प्रकल्प अधिकारी पदावर असलेली महिला लाच घेताना पकडल्या गेली. त्यामुळे महिला लोकसेवकसुद्धा लाचखोरीत काकणभर सरस ठरत असल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग