बांबू लागवड मोहिमेला सुरुवात, धनेगाव येथे हजार बांबू रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:19 IST2021-07-29T04:19:04+5:302021-07-29T04:19:04+5:30

बांबू लागवड विषयी प्रचार, प्रसिद्धी व्हावी म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी बांबू लागवड मोहिमेच्या ...

Bamboo planting campaign started, planting of one thousand bamboo saplings at Dhanegaon | बांबू लागवड मोहिमेला सुरुवात, धनेगाव येथे हजार बांबू रोपांची लागवड

बांबू लागवड मोहिमेला सुरुवात, धनेगाव येथे हजार बांबू रोपांची लागवड

बांबू लागवड विषयी प्रचार, प्रसिद्धी व्हावी म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी बांबू लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा फळरोप वाटिका धनेगाव येथील प्रक्षेत्रावर १ हजार बांबू रोपट्यांची लागवड करण्यात आली. ही बांबू रोपे वृक्षमित्र फाऊंडेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पर्यावरणातील बांबूचे महत्त्व सांगून बांबूपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक फायद्याविषयी माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी, पैनगंगा, मन्याड आसना आदी नदी काठावरील भागामध्ये सामूहिक तसेच वैयक्तिक शेतावर बांबू लागवड करावी, असे आवाहन केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे यांनी यावर्षी जिल्ह्यात १ हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कृषी विभाग व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विभागाच्या रोपवाटिका, तसेच तालुका बीज गुणन केंद्र, कृषी चिकित्सालय आदी क्षेत्रावर ५ हजार बांबूची झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. झाडे लागवडीस सुरुवात झाल्याचे सांगितले.

बांबू लागवड मोहिमेच्या प्रारंभी उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड रविकुमार सुखदेव यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(पोक्रा) योजनेअंतर्गत शेतकऱ्यास वैयक्तिक लागवडीसाठी लक्ष्यांक व अनुदान उपलब्ध असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी नांदेड-सिद्धेश्वर मोकळे, कृषी अधिकारी सानप, कृषी पर्यवेक्षक गोपाळ चामे, वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, कृषी सहायक वसंत जारीकोटे, चंद्रकांत भंडारे, प्रतिभा देशमुख, वर्षा कोलगिरे, बोराळे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बांबू रोपे देण्यात आली.

Web Title: Bamboo planting campaign started, planting of one thousand bamboo saplings at Dhanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.