कोरोना, म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:28+5:302021-06-01T04:14:28+5:30

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. नांदेड जिल्ह्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बळी गेले आहेत. आता म्युकरमायकोसिसचाही फैलाव होत आहे. ...

Awareness about corona, mucormycosis | कोरोना, म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती

कोरोना, म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. नांदेड जिल्ह्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बळी गेले आहेत. आता म्युकरमायकोसिसचाही फैलाव होत आहे. नांदेड शहरासह ग्रामीण भागात आमदार कल्याणकर यांच्या वतीने आरोग्य शिबिर व जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जागृती शिबिरांच्या उद्घाटनप्रसंगी खासदार पाटील यांच्यासह आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंडे, सचिन किसवे, अशोक उमरेकर, जयवंत कदम, निखील लातूरकर, राजू गुंडावार, राजू मोरे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, १ जून रोजी आमदार कल्याणकर यांनी आपला वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी हार, पुष्पगुच्छ न आणता जनतेच्या उपयोगी पडणारे कार्य करावे, असे आवाहन आमदार कल्याणकर यांनी केले.

Web Title: Awareness about corona, mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.