संजय मोरे यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:20 IST2021-03-09T04:20:36+5:302021-03-09T04:20:36+5:30

महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, ...

Award to Sanjay More | संजय मोरे यांना पुरस्कार

संजय मोरे यांना पुरस्कार

महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, समाजातील अनेक कार्यकुशल व्यक्ती यांची राज्य पातळीवरील संघटनेच्या वतीने निवड करून जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार वितरण केले जाते. यावर्षीचा महात्मा ज्योतीराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार तळेगाव तालुका उमरी येथील शिक्षक, लसाकमचे जिल्हासचिव संजय पांडुरंग मोरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. अहमदनगर येथे ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी खासदार श्रीमंत भूषणसिंहजी राजे होळकर हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यशाबद्दल मुख्याध्यापक शंकर मुक्कावार, लसाकम प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, प्रा. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. के. पी. गायकवाड, डी. डी. गायकवाड, प्रा. कदम, निरंजन तपासकर, भारत कलवले, माधव कांबळे, कामाजी गाडीवान, जांभळीकर, नामदेव कंधारे, आदींनी सत्कार केला.

Web Title: Award to Sanjay More