शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

९० व्या वर्षी विधिची परीक्षा देणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 1:17 AM

आजकालच्या तरुणांना शिक्षणात विशेष रस नाही, परंतु शिक्षणाची अविट गोडी चाखल्यानंतर त्यापासून दूर जाण्याची इच्छाच होत नाही, असा जिवंत अनुभव कथन करणारा मुंबईच्या मुख्य भागात राहणारा शिक्षणप्रेमी अवलिया प्रोफेसर मलिक फैजलअली खान हा सद्गृहस्थ वयाच्या ९० व्या वर्षी स्वारातीम विद्यापीठाची कायद्याची परीक्षा देत आहे. विशेष म्हणजे, या वयातही हा अवलिया चष्म्याविना परीक्षेचा पेपर लिहीत आहे.

निवृत्ती भागवत।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरनगर : आजकालच्या तरुणांना शिक्षणात विशेष रस नाही, परंतु शिक्षणाची अविट गोडी चाखल्यानंतर त्यापासून दूर जाण्याची इच्छाच होत नाही, असा जिवंत अनुभव कथन करणारा मुंबईच्या मुख्य भागात राहणारा शिक्षणप्रेमी अवलिया प्रोफेसर मलिक फैजलअली खान हा सद्गृहस्थ वयाच्या ९० व्या वर्षी स्वारातीम विद्यापीठाची कायद्याची परीक्षा देत आहे. विशेष म्हणजे, या वयातही हा अवलिया चष्म्याविना परीक्षेचा पेपर लिहीत आहे.प्रोफेसर मलिक फैजअली खान यांचा जन्म १९२९ मध्ये हैदराबाद शहरात अ‍ॅबिडस् रोडजवळील वस्तीत झाला. त्यांचे वडील फैजअलीखान निझामाचे सचिव होते. त्यांचे प्राथमिक आणि हायस्कूलपर्यंतचे शिक्षण गनफाऊंड्री विद्यालयात झाले. चादरघाट कॉलेजमध्ये त्यांनी पीयुसी केले.उस्मानिया विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी मिळविली. नेपाळमधील काठमांडू येथे राहून एम.ए.ची पदवी मिळविली. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून एम.कॉम.ची पदवी संपादन केली. मुंबई विद्यापीठातून एम.एड्. केले. मद्रास विद्यापीठातून एमबीएची पदवी प्राप्त केली. मनुमान्यम सुंदर विद्यापीठ केरळ येथून एमएस्सी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. कामराज विद्यापीठातून एम.ए. इंग्लिश, दक्षिण भारत विद्यापीठातून एम.ए. अर्थशास्त्र, एम.ए. सायकॉलॉजी, मुंबई विद्यापीठातून बी.लिब. केले. याचबरोबर पदवी, पदविका मिळून एकूण १६ वर पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठात लॉसाठी प्रवेश घेतला. पदवी अपूर्ण राहिली. योगायोगाने मुलाने स्वारातीम विद्यापीठातून बी.एड. केले. येथे प्रवेश घेण्याची इच्छा झाली. लॉसाठी प्रवेश घेतला.योगायोग...प्रोफेसर फैजअली यांच्या मुलाने स्वारातीम विद्यापीठातून बी.एड. केले. आपणही येथे प्रवेश घ्यावा, अशी इच्छा होऊन फैजअली यांनी लॉसाठी प्रवेश घेतला.

टॅग्स :Studentविद्यार्थीeducationशैक्षणिक