शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित हवामान केंद्रच कुचकामी; हवामानाच्या आकडेवारीवर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:07 IST

हवामान केंद्रांची कृषी हवामानशास्त्रज्ञ व स्कायमेट कंपनीच्या तज्ज्ञ प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासणी

ठळक मुद्देहवामानाच्या आकडेवारीवर परिणाम होत असल्याचे तपासणी अभ्यासातून पुढे आले समितीने दिला अभिप्राय शासनाकडे प्रस्ताव पाठविणार

नांदेड :  जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्राची कृषी हवामान शास्त्रज्ञ व स्कायमेट कंपनीच्या तज्ञ प्रतिनिधीच्या उपस्थितीत तपासणी केली असता बहुतांश हवामान केंद्रांची भारतीय हवामान खात्याच्या निकषाप्रमाणे उभारणी झााली नसल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे या हवामान केंद्राच्या परिसरात कुठे घराचे बांधकाम झाले आहे तर कुठे प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. त्यामुळे हवामानाच्या आकडेवारीवर परिणाम होत असल्याचे तपासणी अभ्यासातून पुढे आले आहे.

जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे तेथे फळ पीक विमा मंजूर झाला नाही. तर कमी विमा नोंदविलेल्या महसूल मंडळामध्ये फळ पीक विमा मंजूर झाल्याचा प्रकार यंदा पुनर्रचित हवामाना आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये घडला आहे. या संदर्भात अर्धापूर, दाभड,  लिंबगाव, तरोडा, तुप्यासह इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे आपला अहवाल सादर केला. समितीने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबीया बहार सन २०१९-२० योजनेअंतर्गत केळी या फळ पीकासाठी एकूण अधिसूचित महसूल मंडळापैकी रॅन्डम पद्धतीने सहा महसूल मंडळाची तपासणीसाठी निवड केली. यातील तीन मंडळे विमा मंजूर झालेल्या पैकी तर उर्वरित तीन मंडळे विमा ना मंजूर झालेल्या पैकी होती. समितीला या तपासणीत बहुतांश ठिकाणची स्वयंचलित हवामान केंद्र भारतीय हवामान खात्याच्या निकषाप्रमाणे बसविली नसल्याचे दिसून आले. 

समितीने दिला अभिप्राय शासनाकडे प्रस्ताव पाठविणारजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपला अहवाल सादर करतानाच समितीचा अभिप्राय स्पष्ष्टपणे नोंदविला आहे. फळ पीक विमा नामंजूर झालेल्या महसूल मंडळामध्ये शेजारील विमा मंजूर झालेल्या महसूल मंडळाच्या हवामानाची आकडेवारी ग्राह्य पकडून नुकसान भरपाई द्यावी अथवा सलग चार दिवस अनुक्रमे ४२ व ४५ अथवा तीन दिवस ४२ व ४५ तापमान असल्यास एकूण नुकसान भरपाईच्या सलग चार दिवसासाठी ८० टक्के व तीन दिवसांसाठी ६० टक्के या प्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचा अभिप्राय देण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

केंद्राच्या देखभालीची स्ंयुक्त जबाबदारी घ्यावीसमितीने सहा महसूल मंडळातील अर्धापूर, दाभड, बारड, मुदखेड आणि मुगट या स्वयंचलित हवामान केंद्राची संयुक्त पाहणी केली.  यातील बहुतांश ठिकाणी केंद्राची उभारणी निकषाप्रमाणे झाली नसल्याचे दिसून आले. याचा परिणाम हवामानच्या आकडेवारीवर होत आहे. समितीने केंद्राची उभारणी निकषाप्रमाणे करण्यास सूचित केले आहे.याबरोबरच केंद्राच्या सुरक्षेची व देखभालीची जबाबदारी ग्राम पंचायत व स्कायमेट प्रतिनिधी यांनी करावी असे सांगितले आहे.- बाळासाहेब पाटील रावणगावकर, सभापती तथा समिती सदस्य, नांदेड

टॅग्स :Rainपाऊसenvironmentपर्यावरणFarmerशेतकरी