शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! मराठवाडा एक्स्प्रेसला ग्रहण; उद्या तासभर उशिरा धावणार

By प्रसाद आर्वीकर | Updated: April 4, 2023 19:40 IST

नांदेडहून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

नांदेड : धर्माबाद येथून सुटणाऱ्या मराठवाडा एक्स्प्रेसला पुन्हा ग्रहण लागले असून, ५ एप्रिल रोजी ही रेल्वे एक तास उशिरा सुटणार आहे. मागील काही महिन्यांपासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने, प्रवाशांच्या नियोजनाचा खोळंबा होत आहे.

नांदेडहून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. न्यायालयीन कामकाजासह शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय कारणासाठी अनेक नागरिक दररोज हजारोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगर येथे जातात. दिवसभराची कामे उरकून रात्री परत आपल्या गावी पोहोचण्याचे नियोजन नागरिकांनी केलेले असते. शासकीय कार्यालय सुरू होण्यापूर्वी पोहोचणे ही बाब महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या प्रवाशांसाठी धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे सोयीची ठरत आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून ही रेल्वेगाडी विलंबाने धावत आहे. धर्माबाद येथून सकाळी ४ वाजता सुटणारी ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरात अकरा वाजेपर्यंत पोहोचते; परंतु ५ एप्रिल रोजी ही रेल्वेगाडी धर्माबाद येथून एक तास उशिरा सुटणार आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.

अनेक गाड्या धावल्या उशिरामंगळवारी रेल्वे प्रशासनाने सेलू, ढेंगळी पिंपळगाव, मानवत रोड या ठिकाणी रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम करण्यासाठी ५ तासांचा लाइन ब्लॉक घेतला होता. त्यामुळे ४ एप्रिल रोजी मुंबई-नांदेड (तपोवन), नांदेड-पुणे, काचीगुडा-रोटेगाव आणि नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

टॅग्स :Nandedनांदेडtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे