२३ रोजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यात याव्या या मागणीसाठी नसोसवायएफने विद्यापीठ गेटसमोर उपोषण केले असता याची तात्काळ दखल घेत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांतील पदव्युत्तर पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२०२०मधील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी दुपटीपेक्षा अधिक प्रमाणात आहे. पण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा अपुऱ्या असल्याने नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील जागा वाढून द्याव्यात यासाठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. पण विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने उपोषण सुरू केले. याची तात्काळ दखल घेत कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी या मागणीची दखल घेत अखेरीस विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील दहापेक्षा अधिक जागा वाटून देण्यात येतील, असे चर्चेदरम्यान झालेल्या ठरावातून या मागणीसंदर्भात उपोषणास बसलेले नसोसवायएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. हर्षवर्धन, जिल्हा प्रभारी संदीप जोंधळे,जिल्हा प्रवक्ता संशोधक विद्यार्थी मनोहर सोनकांबळे यांनी रात्री उपोषण सोडले. नसोसवायएफचे राज्य प्रवक्ता प्रा.सतीश वागरे, जिल्हा अध्यक्ष धम्मा वाढवे, संदीप इंगळे, व्यंकटेश राठोड, संघरत्न धुतराज, विद्यापीठ प्रमुख सागर घोडके, प्रसिद्धीप्रमुख शुभम दिग्रस्कर, जिल्हा सेक्रेटरी अक्षय कांबळे, दिनेश येरेकर, प्रवीण सावंत, अनुपम सोनाळे, गोपाळ वाघमारे या शिष्टमंडळाने कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्याशी चर्चा केली.
नसोसवायएफच्या मागणीची दखल; सर्व अभ्यासक्रमाच्या दहापेक्षा अधिक जागा वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST