आष्टीचाही कालवा फुटला; कालवे फुटण्याची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:18 IST2018-02-01T00:17:53+5:302018-02-01T00:18:10+5:30
सोमवारी अंबाळा (३८ क्रमांक) कालवा फुटल्याने काही पाणी पुढे वाहून गेले़ या पाण्याने आष्टीचा कालवा फोडला़ कालवे फुटणे दुर्घटना आहे की कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांतील शितयुद्ध? याबद्दल विविध चर्चा सुरू आहे़

आष्टीचाही कालवा फुटला; कालवे फुटण्याची मालिका सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : सोमवारी अंबाळा (३८ क्रमांक) कालवा फुटल्याने काही पाणी पुढे वाहून गेले़ या पाण्याने आष्टीचा कालवा फोडला़ कालवे फुटणे दुर्घटना आहे की कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांतील शितयुद्ध? याबद्दल विविध चर्चा सुरू आहे़
दाती सीआर नं. २ कालवा शाखेचा विसर्ग (संकल्पित) १२़२२ क्यूमेक्स असताना केवळ ९ क्यूमेक्स पाणी विसर्ग करता येते़ यामुळे पाणी शेवटपर्यंत जाण्यासाठी विलंब होतो़ शाखा कालव्याच्या साखळी क्रमांक १३२५, ६७९०, ७८६०, १७३१२, १९३८०, २८१८५, ४७६०२, ६०७५०, ६७९४५, ६८६३०, ७२३४०, ८३०२० या साखळी क्रमांकावर वरील जलसेतू नादुरुस्त आहेत़ त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याच शाखा कालव्यावरील एचपीसी साखळी क्रमांक ३०२०, १००५३, १०८९०, ११८९७, १२०७०, १२७३०, १३४३०, १६५७०, २००००, २०२००, २६२३८, २९६४३, २९९१५, ३००८५ नादुरुस्त असून एचपीसीवरील अस्तरीकरणामध्ये छिद्रे आहेत़ अस्तरीकरणास भेगा पडल्या. शाखा कालव्याचे साखळी क्रमांक ७०००० ते ८०२०० मी़ मधील कालव्याच्या काटछेदात मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढले. साखळी क्रमांक ८०,००० मी़ ते ९०,००० मी़ पर्यंतच्या भागात कालव्याच्या काटछेदाचे आकारमान संकल्पनाप्रमाणे पूर्ण झाले नसल्याने तलमान ठिकठिकाणी उंच व खोल आहेत़ कालव्याचा भराव ठिकठिकाणी नादुरुस्त अवस्थेत आहे़ त्यामुळे संकल्पनेच्या तुलनेत फक्त २० टक्के पाणी विसर्ग प्रवाहित होवू शकते़ साखळी क्रमांक ८०,००० ते ९०,००० मीटरपर्यंत अस्तरीकरणाचे काम पैनगंगा प्रकल्प विभाग क्ऱ५ हदगाव प्रस्तावित आहे़ त्यामुळे उभ्या पिकाला पाणी विसर्ग करणे शक्य होणार नसल्याचे पत्र जिल्हा कार्यालयास डिसेंबर महिन्याच्या १८ तारखेला देण्यात आले, मात्र पत्राची दखल घेण्यात आली नाही.
कालवा फुटला की निधी येतो अन् काम सुरु होते
कालव्याच्या कामाला निधी नाही, असे सांगितले जाते, मात्र कालवा फुटल्यानंतर कामासाठी निधी मिळतो, हे कसे काय? निधी येतो कुठून? तोच निधी फुटण्यापूर्वीच वापरला असता तर पाणी वाया गेले नसते़ मात्र उलटेच झाले़ पाणी वाया गेले़ शेतकºयांची पिके करपली़ शासनाचा पाणीकर बुडाला व कामासाठी तत्काळ निधीही उपलब्ध करून द्यावा लागला़ यापूर्वी आष्टीला दोनदा कालवा फुटला होता़ खरे तर याच मार्गावर आजी-माजी आमदारांची शेती आहे़ तरीही कामे ढिसाळ झाली़ पुढाºयांचा अधिकाºयांवर जरब नाही, हे यावरुन सिद्ध होते.दरम्यान, हदगावचे सक़ार्यकारी अभियंता आऊलवार यांची बदली झाल्याने आता त्यांचा पदभार कोणाला मिळतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे कालवा फुटण्याची मालिका सुरू आहे की काय, अशी चर्चा सुरू आहे़