शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री खोदला खड्डा अन् पसरली गुप्त धनाची अफवा; पोलीसही आले, खऱ्या कारणाने सारे अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:47 IST

गुप्तधनाच्या अफवेने खळबळ; पोलिसांनी खोदकाम करणाऱ्याची केली विचारपूस

किनवट (जि. नांदेड) : शहरातील सुभाष नगर परिसरात गुप्त धन सापडल्याच्या अफवेमुळे एकच खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारात एका घराच्या अंगणात खड्डा खोदला जात असल्याचे लक्षात येताच परिसरात नागरिकांची गर्दी जमली. "खरेच काहीतरी गुप्तधन सापडलंय का?" या चर्चांना उधाण आले. पोलिसांना देखील धाव घ्यावी लागली. चौकशी केली तेव्हा कुठे खरे कारण समोर आले. 

ही अफवा इतकी पसरली की, पोलिसांना स्वतः घटनास्थळी दाखल व्हावे लागले. पोलिस निरीक्षक देविदास चोपडे व त्यांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले की, संबंधित व्यक्तीचे नातेवाईक आदिलाबाद (तेलंगणा) येथून आले असून, केवळ शौचालय बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात येत होता.

तथापि, खोदकाम रात्री करण्यात आले आणि त्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवण्यात आल्याने पोलिसांनी सतर्कता दाखवली. “हा गुन्ह्याचा प्रकार नसला तरी शंका निघाल्यामुळे संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येईल. संपूर्ण प्रकाराची नोंद स्टेशन डायरीमध्ये करण्यात येणार आहे,” अशी माहिती निरीक्षक चोपडे यांनी दिली.

दरम्यान, घटना उजेडात येताच सोशल मीडियावर चर्चांचा धुराळा उडाला. काहींनी या अफवेवर विश्वास ठेवत खड्ड्याचे फोटो शेअर केले, तर काहींनी या प्रकारावर टीका केली. हे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे नसले तरी अफवांनी शहरात गोंधळ माजवला. यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड