नवामोंढ्यात हळदीची आवक वाढताच भाव झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:24+5:302021-04-30T04:22:24+5:30
बाजार समितीत हळदीची आवक कमी असताना १० ते ११ हजार रुपये भाव मिळत होता, तर आता दररोज नवामोंढा येथे ...

नवामोंढ्यात हळदीची आवक वाढताच भाव झाले कमी
बाजार समितीत हळदीची आवक कमी असताना १० ते ११ हजार रुपये भाव मिळत होता, तर आता दररोज नवामोंढा येथे १ हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. त्यामुळे हळदीला साडेसहा ते ८ हजारच्या दरम्यान भाव मिळत आहे.
चौकट-
शेतकऱ्यांना नेहमीच अशा परिस्थितीतून जावे लागते. शेतमालाची आवक वाढली की बाजारात त्याची किंमत कमी हाेते. त्यामुळे केलेल्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही. आताही हळदीची आवक वाढताच भाव कमी झाले आहेत. - हनुमान चंदेल, महिपाल पिंपरी.
चौकट-
नांदेड कृषी बाजार समितीने खुले सौदे बंद करून थेट आलेल्या हळदीसाठी लिलाव सुरू केले आहेत. हा निर्णय चांगला आहे. यामुळे बाजार समिती व शेतकरी या दोघांचाही फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे त्याच दिवशी वजन होत आहे. - प्रल्हाद इंगोले, शेतकरी नेते