सोन्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या तरुणाला लुटणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST2020-12-24T04:17:37+5:302020-12-24T04:17:37+5:30
२१ डिसेंबर रोजी सकाळीच सोबत पैसे घेऊन विनोद व त्याचा भाऊ किनवट येथे दुचाकीने आले. सोन्याचे नाणे घेऊन येणाऱ्यांची ...

सोन्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या तरुणाला लुटणारा अटकेत
२१ डिसेंबर रोजी सकाळीच सोबत पैसे घेऊन विनोद व त्याचा भाऊ किनवट येथे दुचाकीने आले. सोन्याचे नाणे घेऊन येणाऱ्यांची वाट पाहत थांबून काही वेळाने खरबी टी पॉइंट साई मंदिराजवळून ते दराटीकडे जात होते. तेवढ्यात अचानक पाठीमागून आलेल्या मोटरसायकलस्वाराने विनोदच्या खांद्यावरील पैशाने भरलेली बॅग हिसकावली. यावेळी झालेल्या झटापटीत बॅग हिसकावणाऱ्याच्या तोंडाचा रुमाल निघाल्याने जबरीने पैशाची बॅग हिसकावणारा आकाश पवार असल्याचे लक्षात आले; पण तेवढ्यात काळ्या रंगाचे चारचाकी वाहन ज्यात पोलीस नावाची पाटी होती या वाहनातून एक महिला व एक पुरुष बाहेर पडले आणि विनोद इंगोले व आकाश पवार यांच्या ते पाठीमागे लागले. तेवढ्यात विनोद भीतीने रस्त्यालगतच्या शेतात पळाला व गाडीतील लोकांनी आकाश पवारला घेऊन पोबारा केला. घडलेल्या घटनेनंतर भयभीत झालेल्या विनोदने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर रात्री गुन्हा नोंद केला. तपासात या नावाचा इसम लांजी, ता. माहूर येथे असल्याचे समजले. त्यानंतर माहूर पोलिसांच्या मदतीने लांजी गावात जाऊन विचारपूस केली असता आकाश हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता घरात पैशाची बॅग आढळून आली. पोलिसांनी नगदी २ लाख ५० हजार रुपये जप्त केले. उर्वरित रकमेबाबत विचारपूस केली असता गाडीतील मंदा नावाच्या महिलेने सदर पैसे नेल्याचे आरोपीने सांगितले. पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी चोरट्यांची ही साखळी मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आरोपी आकाश पवार याला आज किनवटच्या न्यायालयासमोर उभे केले असता २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.