शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापुरी केळीला बाजारात आला भाव; पण काढणीस विलंब होत असल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:01 IST

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती.

पार्डी (जि. नांदेड) : पावसाला विलंब होत असून, केळी पिकासाठी पोषक वातावरण निर्माण होत नसल्याने केळीच्या घड काढणीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण केळीला सध्या बाजारात २००० ते १८०० रुपये दर मिळत आहे; मात्र केळी काढणीस वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. केळीला भाव समाधानकारक; पण अर्धापूर परिसरातील केळी काढणीला वेळ असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. कोरोनाच्या पहिल्या वर्षात केळीला कवडीमोल दर मिळाला होता, तर त्यांच्या दुसऱ्या वर्षांत केळीवर पडलेल्या रोगराईमुळे केळीचे अतोनात नुकसान झाले आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली होती; मात्र यंदा केळीच्या दरात सुधारणा झालेली दिसत आहे. पुढील काळातही हाच दर राहिला आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा बाळगून आहे. काही शेतकऱ्यांकडील केळी काढणीस सुरुवात झाली असून, त्यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

शेतकऱ्यांना केळी तारणहार ठरणार का?अर्धापूर परिसर केळीसाठी प्रसिद्ध असून, येथील केळी अनेक राज्यांत पाठविली जाते, तसेच परदेशातही अर्धापुरी केळीची चव चाखली जाते; मात्र मागील दोन वर्षांपासून केळीला कवडीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले होते; परंतु यंदा सुरुवातीपासून केळीला योग्य दर मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे; मात्र पुढील काळातही हाच दर स्थिर राहतो की नाही पुढील काळात कळेल; परंतु सध्याच्या परिस्थितीत केळीला चांगला दर मिळत असल्याने केळी उत्पादकासाठी अपेक्षा वाढल्या आहेत. मागील वर्षांत झालेले नुकसान भरून निघेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड