शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नांदेडात ५२११ घरांना आवास योजनेतून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:07 IST

यातील ५ हजार २११ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून मार्च २०१९ पर्यंत शहरातील ६ हजार ३०५ जणांना या योजनेतून घर देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे़

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना ४६ हजार अर्ज, २०१९ मार्चअखेरपर्यंत ६३०५ घरांचे उद्दिष्ट

विशाल सोनटक्के।नांदेड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील सर्वांसाठी घरांची संकल्पना राबविण्यात येत आहे़ या योजनेअंतर्गत शहरातून ४६ हजारांहून अधिक नागरिकांनी हक्काच्या घरासाठी अर्ज केले आहेत़ यातील ५ हजार २११ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून मार्च २०१९ पर्यंत शहरातील ६ हजार ३०५ जणांना या योजनेतून घर देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे़शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, या योजनेला शहरातून मोठा प्रतिसादही मिळत आहे़ या योजनेअंतर्गत क्लास-२ या घटकातून महानगरपालिकेकडे २ हजार ७४४ अर्ज प्राप्त झाले आहेत़ त्यातील १६२१ प्रस्तावांवर मनपाच्या वतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून ११२३ प्रस्तावांच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे़ घटक एएचपी-३ मधून महानगरपालिकेकडे २३ हजार २५५ अर्ज प्राप्त झाले आहेत़ यातील ११ हजार २७६ प्रस्तावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित ११ हजार ९७९ सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे़ तर घटक बीएलसी-४ यातून १९ हजार ७१५ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत़ प्राप्त झालेल्या अर्जापैकी ११ हजार ६०७ प्रस्तावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, ८ हजार १०८ सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे़ महानगरपालिकेने मार्च २०१९ पर्यंत ६ हजार ३०५ घरे योजनेच्या माध्यमातून देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, २०२२ पर्यंत नांदेड शहरात या योजनेतून २१ हजार १७ लोकांना हक्काचे घर देण्याचा मनपाचा प्रयत्न आहे़प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने शहराच्या विविध भागांत ११ डीपीआर तयार केले आहेत़ त्यातील १० डीपीआरला मंजुरी मिळाली आहे़ तर १ डीपीआर मंजुरीच्या प्रक्रियेत आहे़ मंजूर डीपीआरनुसार ३ हजार ७९१ घरकुलांची संख्या असून यातील १०३९ घरकुलांच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांनी महानगरपालिकेकडे बांधकाम परवानेही मागितले आहेत़ प्रशासनाच्या वतीने कागदोपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर यातील ९१५ बांधकामांना प्रत्यक्ष परवानगी देण्यात आली असून परवानगी मिळालेल्या या घरांच्या बांधकामास सुरुवात झाली आहे़ पंतप्रधान आवास योजनेमुळे लाभार्थ्यांना अडीच लाखांपर्यंतचे अनुदान मिळत असून, बांधकाम परवानाही तातडीने दिला जात आहे़हडकोत ९३५ तर वाघाळ्यात ८५० घरांचा प्रस्तावपंतप्रधान आवास योजना (नागरी) साठी मनपाच्यावतीने ११ डीपीआर तयार केले आहेत़ त्यातील १० डीपीआरला मंजुरीही मिळाली असून यासाठी ८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़ झोन क्ऱ१ मध्ये २५० आणि ३३५ घरांचे दोन प्रकल्प़ झोन क्ऱ२ मध्ये २५० आणि ५०० अशा ७५० घरांचे दोन प्रकल्प़ झोन क्ऱ ३, ४ व ५ मध्ये ५०० घरांचा तर झोन क्ऱ६ मध्ये २५० आणि ४८६ घरांचे दोन प्रकल्प असे एकूण ३ हजार ७९१ घरांचे हे प्रस्ताव असून या प्रकल्पाची किंमत २१८७६़०७ लाख इतकी आहे़ या सर्व प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून ८ कोटींचा निधीही या प्रकल्पासाठी प्राप्त झाला आहे़ दरम्यान, हडकोमध्ये ९३५ घरकुलांचा प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाचा डीपीआर व नकाशा तयार करण्याचे काम सुरु आहे़ तर वाघाळा भागात ८५० घरकुलांचा प्रस्ताव असून तेथील प्रक्रियाही सुरु असल्याचे मनपाचे उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाHomeघर