शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

मराठा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेअर लागू करा - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:06 IST

शासनाने मराठा विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याप्रमाणे आरक्षणाच्या प्रक्रिेयेवर कारवाई केली आहे.

ठळक मुद्देसध्या गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.

परभणी :  मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाऱ्या परिपत्रकात आरक्षण लागू झाल्यानंतर विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळेल, असे म्हटले आहे. मात्र सध्या या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात स्थगिती असल्याने मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तेव्हा सरकारने गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमीलेअरची अंमलबजावणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी परभणी येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. ॲड. आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेल तेव्हा उठेल. मात्र सध्या गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. विशेष: विविध शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सवलत मिळायला हवी. मात्र शासनाने मराठा विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याप्रमाणे आरक्षणाच्या प्रक्रिेयेवर कारवाई केली आहे. तेव्हा मराठा विद्यार्थ्यांसाठी ओबीसी आरक्षणाच्या धरतीवर क्रिमीलेअर व नॉन क्रिमीलेअरची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड. आंंबेडकर यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेस विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे, प्रदेश प्रवक्ते फारेख अहमद, गोविंद दळवी, प्रवीण रानबागुल, केशव मुद्देवाड, संतोष सूर्यवंशी, रमेश गायकवाड, जिंतेंद्र सिरसाठ, डाॅ. सुरेश शेळके, डॉ. संघरत्न कुऱ्हे, संयोजक डॉ. धर्मराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आलमगीर खान आदींची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीने मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी प्रा. नागोराव पांचाळ यांना उमेदवारी दिली आहे. या निमित्ताने ही पत्रकार परिषद घेऊन वंचितची भूमिका आंबेडकर यांनी यावेळी मांडली.

आरक्षित वर्गावरही अन्यायजुलै २००६ मध्ये शासनाने एक पत्र काढून त्या आधारे ५० टक्क्यांचे आरक्षण सरसकट २५ टक्क्यांवर आणले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील १८ हजार आरक्षित विद्यार्थी हक्कापासून वंचित राहत आहेत. अभियांत्रिकी विभागातही अशाच पद्धतीने शासनाकडून आरक्षित वर्गावर अन्याय केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड