अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जमात प्रमाणपत्र पडताळणीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:26+5:302021-05-30T04:16:26+5:30
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने १० डिसेंबर २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेऊ ...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जमात प्रमाणपत्र पडताळणीचे आवाहन
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने १० डिसेंबर २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विहित कालमर्यादेत जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याबाबत आदेशित केले आहे. त्याअनुषंगाने मराठवाडा प्रशासकीय विभागातील २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) या राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे जमात पडताळणी कार्यवाही विहित कालमर्यादेत पूर्तता करण्याचा निर्णय समितीद्वारे घेण्यात आला आहे. विद्यार्थी व पालकाची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रकरणी प्रथम प्राधान्याने जमात दावा पडताळणीच्या कार्यवाहीबाबत पूर्तता करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी झाल्याने प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी सांगितले आहे.