१ जूननंतर कापूस बियाण्याची लागवड करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST2021-05-17T04:16:07+5:302021-05-17T04:16:07+5:30
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ नांदेड : सन २०२१ - २२मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, गळीतधान्य ...

१ जूननंतर कापूस बियाण्याची लागवड करण्याचे आवाहन
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड : सन २०२१ - २२मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनीकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी गुरुवार, २० मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके कार्यक्रम पुढील नमूद पिकांसाठी राबविण्यात येतो. यात कडधान्य तूर, मूग, उडीद, पौष्टीक तृणधान्य ज्वारी, गळीतधान्य सोयाबीन, तीळ, व्यापारी
पिके कापूस, ऊस या पिकांचा समावेश आहे.
बियाणे वितरणात नमूद केलेल्या कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणास ५० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणास २५ रुपये प्रतिकिलो, ज्वारी सरळ वाणाच्या बियाण्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणास ३० रुपये प्रतिकिलो, १० वर्षांवरील वाणास १५ प्रति किलो. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षांच्या वाणास १२ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे आहे. एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविके खते, सुक्ष्म मूलद्रवे, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार २ हजार ते ४ हजार रुपये प्रतिएकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.