नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:17 IST2021-03-28T04:17:30+5:302021-03-28T04:17:30+5:30

सहकार आयुक्त पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सभासदांना ऑनलाइन लिंक पाठवून २७ मार्च रोजी ऑनलाइन सभा पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेचे ...

Annual meeting of Nanded District Malaria and Elephant Disease Employees Co-operative Credit Society online | नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन

नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन

सहकार आयुक्त पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सभासदांना ऑनलाइन लिंक पाठवून २७ मार्च रोजी ऑनलाइन सभा पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन सुभाष कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सर्व सभासद बांधवांना विमा लवकरात लवकर लागू करण्यात यावा, अशी सभासदांनी मागणी केली. येत्या काही दिवसांत सर्व सभासद बांधवांचा विमा करण्यात येणार आहे. सभासदांची माहिती संबंधित कार्यालयाकडून अप्राप्त आहे अशी माहिती कल्याणकर यांनी दिली.

यावेळी सत्यजित टिप्रेसवार सचिव, माणिक गिते, मोहन पेंढारे, संजय भोसले संचालक, कैलास मोरे लिपिक उपस्थित होते. अशोक ढवळे व्हा.चेअरमन, चंद्रभान धोंडगे पंच, बालाजी आळणे, देवीदास भुरेवार, प्रदीप गोधने, मनोहर खानसोळे, राजकुमार ढवळे संचालक हे ऑनलाइन होते.

पतसंस्थेच्या वतीने सचिव सत्यजित टिप्रेसवार यांनी आभार मानले.

Web Title: Annual meeting of Nanded District Malaria and Elephant Disease Employees Co-operative Credit Society online