जयंतीनिमित्त मिरवणुकीची परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:46+5:302021-04-03T04:14:46+5:30
कोरेाना लसीकरण मोहीम किनवट : प्राथमिक आरोग्य केंद्र दहेलीतांडा अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सारखणी येथे कोरोना लसीकरणाचा ...

जयंतीनिमित्त मिरवणुकीची परवानगी द्यावी
कोरेाना लसीकरण मोहीम
किनवट : प्राथमिक आरोग्य केंद्र दहेलीतांडा अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सारखणी येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रेमसिंग राठोड, भारत पाटील, नवीन वाघमारे, सचिन जाधव, एस.आर. काळे, ए.आर. कमटलवार, वाय.एस. मडावी, एस.जी. कळसे, श्रीमती पंचफुलारी सांगळे आदी उपस्थित होते.
शालेय साहित्याचे वाटप
बिलोली : नागणी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यात झेरॉक्स मशीन १, व्हाईट बोर्ड ५, बॅटरी, प्रोजेक्टर, धान्य कोटी, फायबर खुर्ची, कॅम्प्युटर, ट्रे, वजन काटा आदींचा समावेश आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
भालेराव यांना निरोप
लोहा : नेहरूनगर लिंबोटी, गोंडगाव येथील मुख्याध्यापक व्ही.एस. भालेराव सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.