ॲम्बुलंस भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:26+5:302021-04-30T04:22:26+5:30
नागरिकांचे लसीकरण धर्माबाद : शहर व ग्रामीण भागात असे मिळून ११ हजार नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे ...

ॲम्बुलंस भेट
नागरिकांचे लसीकरण
धर्माबाद : शहर व ग्रामीण भागात असे मिळून ११ हजार नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिली. सद्यस्थितीत २० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या चार गावांमध्ये बंदी घालण्यात आली. त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा पोहोचल्याचेही शिंदे म्हणाले.
आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन कधी
धर्माबाद : तालुक्यातील राजापूर येथील आरोग्य उपकेंद्र मागील सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. माैजे राजापूर, पांगरी, जुन्नी, बाचेगाव, रामखडक, हसनाळी या गावासाठी हे जवळचे केंद्र आहे. दरम्यान सदर केंद्र लवकरच कार्यान्वित होईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक खंदारे यांनी दिली.
पेयजल केंद्राची मागणी
बिलोली : तालुक्यातील चिरली-टाकळी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्वच्छ पेयजल केंद्र सध्या बंद आहे. ग्रामपंचायतीने केंद्र सुरू करण्याची मागणी मारोती बोंबले यांनी केली. बीआरबीएफ योजनेअंतर्गत चिरली टाकळी गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी पेयजल केंद्र उभारण्यात आले होते. मात्र ते बंद असल्याने लाेकांना त्याचा फायदा होत नाही.
कोविड सेंटरची मागणी
मुदखेड : शहरातील अग्निशमन दलाच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. अग्निशमन दलाची इमारत दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले. निवेदनावर शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक, प्रकाश बल्फेवाड, अभिजीत नातेवाड, अमोल अडकिणे, कालीदास जंगीलवाड, संतोष चमकुरे, गजानन कमळे, प्रकाश सूर्यवंशी, शिवा एडके यांची नावे आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी
माहूर : तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र केशवे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील रुग्णांना इतरत्र पाठवावे लागते. त्या दरम्यान रुग्णांचा रस्त्यातच मृत्यू होतो असे नमूद करण्यात आले.
धान्य कीट वाटप
मांडवी : येथील व्यापारी गणेश जयस्वाल यांनी हनुमान जयंतीनिमित्त गोरगरिबांना २०० कीट धान्य वाटप केले. लाॉकडाऊनमुळे गरिबांवर उपासमारीची वेळ आली होती. यावेळी आशिष जयस्वाल, प्रशांत जयस्वाल, गजानन बंडेवार, प्रवीण श्रीमनवार, दत्ता शिरपूरकर, शैलेश निलकंठवार, शेखर श्रीमनवार, प्रल्हाद राठोड उपस्थित होते.
शेलगावमध्ये भीमजयंती
उमरी : तालुक्यातील शेलगाव येथे भीमजयंती साजरी करण्यात आली. कायर्यक्रमाला सरपंच माधवराव कदम, संजय पाटील कदम, सदस्य रमेश टोम्पे, नामदेव भदरगे, राजू टोम्पे, माधव हणवते, गोविंद हणवते, मधुकर हणवते, व्यंकटी वाघमारे, प्रकाश झुंजारे, गाौतम हणवते, माधवराव हणवते आदी उपस्थित होते.