मातंग समाजापुढे आंबेडकरवाद हाय पर्याय : बळवंत घोरपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:34+5:302021-06-02T04:15:34+5:30
डॉ. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त पंकजनगर, धनेगाव येथे डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा आंबेडकरवाद आणि सद्य:स्थिती या विषयावर ...

मातंग समाजापुढे आंबेडकरवाद हाय पर्याय : बळवंत घोरपडे
डॉ. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त पंकजनगर, धनेगाव येथे डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा आंबेडकरवाद आणि सद्य:स्थिती या विषयावर व्याख्यान घेण्यात आले, त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या व्याख्यानमालेचा हा नववा कार्यक्रम होता.
अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते गंगाराम कांबळे होते. उद्घाटन विनायकराव डोईबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवान बुद्ध, महात्मा बसवेश्वर, कार्ल मार्क्स, महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी तुकाराम टोंपे, बालाजीराव गुंडिले, प्रभाकर ढवळे, विश्वनाथ वाघमारे, शाहीर डी. एन. वाघमारे, बळी आंबटवाड, पंडित सोनकांबळे, अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे जिल्हाध्यक्ष बाबू शिंदे, बहुजन मजूर कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेव झुंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन मारोती चिवळीकर यांनी केले, तर कृष्णा बाबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.