शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

तस्करीसाठी कुख्यात चिखलीत पुन्हा धाड; अख्या गावाचा आहे सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:20 IST

१९९५ पासून वनविभागाची सलग कारवाई तरीही सागवानाची तस्करी थांबेना

ठळक मुद्देगावातील शेकडो जणांवर तस्करीचे गुन्हेगावातील नागरिक पिढ्यान्पिढ्या जंगलातील वनसंपदेवर गुजराण

किनवट : सागवानासह इतर मौल्यवान लाकडांच्या तस्करीसाठी नांदेड जिल्ह्यात कूप्रसिद्ध असलेल्या चिखली गावात पुन्हा ७ जानेवारीच्या पहाटे वनविभागाच्या पथकाने धाड मारली़ या धाडीत सव्वालाख रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले आहे़ १९९५ पासून या गावावर वनविभागाच्या वतीने धाडी मारल्या जात असल्या तरी, तेथील सागवानाची तस्करी थांबत नसल्याने चिखली ग्रामस्थांच्या या तस्करी प्रकरणाकडे आता वेगळ्या अंगाने पाहण्याची गरज दिसत आहे़ 

तालुक्यात लाकूड तस्करीसाठी कूप्रसिद्ध असलेल्या चिखली (बु) येथे वनविभागाने महसूल विभागाच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी भल्या पहाटे धाड टाकली़ यावेळी १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचे सागवानाचे मौल्यवान कटसाईज व गोल माल १९४ नग जप्त केले़  यापूर्वी आॅपरेशन ब्ल्यू मुन ,आॅपरेशन चिखली यासारखी मोहीम राबवून लाखों रुपये किमतीचा माल जप्त केला होता़

चिखली (बु) गावात अवैध सागवानी लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली  होती़ त्यावरून नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, किनवटचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक व्ही़ एऩ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसहा वाजता नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम व  वनक्षेत्रपाल के़ एऩ खंदारे, बी़पी़आडे, पीक़े़शिंदे, किनवट फिरत्या पथकाचे योगेश शेरेकार,  अविनाश तैनाक, श्रीकांत जाधव, आऱआऱचोबे, वनपाल के़जी़ गायकवाड, एस़ एऩ सांगळे, आऱ एऩ सोनकांबळे, मोकले व महिला कर्मचाऱ्यांनी चिखली (बु) येथे धाड टाकली़

यावेळी अवैध साठवून ठेवलेले ७६ हजार ३१९ रुपये किमतीचे १५७ कटसाईज मौल्यवान सागवान व ३८ हजार ३०६ रुपये किमतीचे गोल माल ३७ नग असा १ लाख १४ हजार ५२५ रुपये किमतीचे १९४ नग जप्त केले़ पहाटेच वनविभागाने चिखली गावाला अक्षरश: गराडा घातला होता़ यावेळी घरांची झडती सुरु असताना, काही जणांनी नायब तहसीलदार            सर्वेश मेश्राम व वनविभागाच्या  कर्मचाऱ्याला जाब विचारला़ महिला वन कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली़ 

गावातील शेकडो जणांवर तस्करीचे गुन्हेचिखली हे गाव सागवान तस्करीसाठी जिल्ह्यात कूप्रसिद्ध आहे़ १९९५ मध्ये उपवनसंरक्षक असलेल्या एमक़े़राव त्यानंतर खांडेकर, राजेंद्र नाळे, आशिष ठाकरे यांच्या कार्यकाळात चिखली गावावर अनेकवेळा धाडी टाकण्यात आल्या़ आॅपरेशन ब्लू मून, आॅपरेशन चिखली राबविण्यात आले़ या ठिकाणाहून प्रत्येकवेळी दोन ते तीन ट्रक भरुन सागवान जप्त करण्यात आले़ तस्करी प्रकरणात आतापर्यंत शेकडो जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़चिखली गावातील नागरिक पिढ्यान्पिढ्या जंगलातील वनसंपदेवर गुजराण करीत आले आहेत़ गाव व परिसरात दुसरे काम नसल्यामुळे नवीन पिढीही सागवान तस्करीला लागली आहे़ सागवान तस्करीतून चांगले पैसेही मिळतात़ गावात निरक्षतेचे प्रमाणही अधिक आहे़ त्यामुळे या गावातील लोकांसाठी एखादा प्रकल्प सुरु केल्यास सागवान तस्करीला आळा घालता येवू शकतो़ 

टॅग्स :forest departmentवनविभागSmugglingतस्करीNandedनांदेडraidधाड