शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चार वर्षानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:49 IST

शेतीसाठी अनावश्यक पाणी पाळ्यांचा आग्रह त्याचवेळी अवैध जलउपसा रोखण्यासाठी झालेली कुचराई यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेला असून चार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी तळाला : प्रकल्पात उरला केवळ ४.९४ दलघमी पाणीसाठा २.७० दलघमी मृत जलसाठा

नांदेड : शेतीसाठी अनावश्यक पाणी पाळ्यांचा आग्रह त्याचवेळी अवैध जलउपसा रोखण्यासाठी झालेली कुचराई यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेला असून चार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे. विशेषत: दक्षिण नांदेडवर जलसंकट घोंगावत आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी जलाशयातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात केवळ ४.९४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. आजघडीला शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विष्णूपुरीतून प्रतिदिन ०.२५ दलघमी पाणी कमी होत आहे. याच वेगाने पाणी कमी झाले तर केवळ ३१ मे पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे.यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने नांदेडकडे पाठ फिरविल्याने सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. पर्यायाने जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने जानेवारी महिन्यापासूनच नांदेड शहरासह ग्रामीण भागालाही टंचाईच्या झळा बसवू लागल्या आहेत. त्यातच नांदेड शहरासह परिसरातील गावांची तहान भागविणा-या विष्णूपुरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वेगाने घट होऊ लागली आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेवून मनपा प्रशासनाने पाणी कपातीचे धोरण अवलंबिले आहे. मात्र त्यानंतरही प्रकल्पात अवघा ४.९४ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे.विष्णूपुरीतून शहराला ३१ मे पर्यंत जिवंत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यानंतर शहराची तहान प्रकल्पातील मृत जलसाठ्यातून भागवली जाणार आहे. प्रकल्पाच्या मृत जलसाठ्याची क्षमता २.७० दलघमी इतकी आहे. मात्र आजघडीला प्रकल्पात असलेला गाळ पाहता मृत जलसाठ्यातून २ दलघमी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. यातून १५ दिवस म्हणजेच १५ जूनपर्यंत शहराची तहान भागवता येणार आहे. त्यातही पावसाळा लांबल्यास मात्र दक्षिण नांदेडकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.दरम्यान, आयुक्त काकडे यांनी बुधवारी काबरानगर येथील जलशुद्धीकरणाची पाहणी करुन पाणी शुद्धीकरणाबाबत माहिती घेतली. आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता संघरत्न सोनसळे, रमेश चौरे आदींनी जलशुद्धीकरण केंद्रातील कार्याची विस्तृत माहिती दिली.जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई मुखेड तालुक्यात जाणवत असून सद्य:स्थितीत ५१ टँकरद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. टंचाई निर्मूलनार्थ विहीर व बोअर अधिग्रहणाचे १५७ प्रस्ताव दाखल झाले असून त्यातील १११ अधिग्रहण प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र एकाही प्रस्तावाला तहसील कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.दहा अतिरिक्त पंप लावण्यात येणारविष्णूपुरी प्रकल्पातील शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ मध्ये मृत जलसाठ्यातील पाणी घेण्यात आले होते. त्यानंतर आता २०१९ मध्ये मृतजलसाठ्यातून पाणी घेण्याची वेळ आली आहे. तत्कालीन आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी घेण्यात आले.आता प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी मृत जलसाठ्यातूृन पाणी घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन वेळीच केले आहे. कोटीतीर्थ आणि काळेश्वर येथे पाणी घेण्यासाठी १० अतिरिक्त पंपाद्वारे पाणी घेवून जॅकवेलमध्ये सोडले जाईल. तेथून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेले जाणार आहे.उत्तर नांदेडकरांची पाण्याबाबत बल्ले... बल्ले...पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे उत्तर नांदेडला सांगवी बंधाºयातून पाणीपुरवठा केला जात आहे. इसापूर प्रकल्पातून पाचवी पाणीपाळी ८ मे रोजी सोडण्यात आली आहे. हे पाणी गुरुवारी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे. या पाण्याने २५ दिवस उत्तर नांदेडची तहान भागली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा १ ते १० जूनदरम्यान आवश्यकतेप्रमाणे इसापूर प्रकल्पातून सहावी पाणीपाळी घेतली जाणार आहे. त्यामुळे उत्तर नांदेडकर पाणीप्रश्नाच्या चिंतेतून मुक्त झाले आहेत.शुद्ध पाणीपुरवठाप्रकल्पातील पाणीपातळी तळाला गेल्याने गढूळ पाणी येत आहे. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त काकडे यांनी पाणीपुरवठा विभागाला सूचना केल्या. त्याचवेळी काही भागात स्वत: पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणादरम्यान आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यानंतर केंद्रातील फिल्टर बेड हे आठ तासांच्या अंतराने स्वच्छ केले जात आहे. त्यातच क्लोरीनच्या प्रमाणाकडेही लक्ष दिले जात आहे. शहराला उन्हाळ्या शेवटी आणि पावसाळ्याच्या प्रारंभी शुद्ध पाणी पुरवठा होईल, याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे काकडे म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater pollutionजल प्रदूषण