शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्र काढण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:34 IST

शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र काढण्याची सूचना महापालिकेने महावितरणकडे केली होती. मात्र, ही कार्यवाही जिल्हाधिका-यांशी चर्चा करुन केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

नांदेड : शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र काढण्याची सूचना महापालिकेने महावितरणकडे केली होती. मात्र, ही कार्यवाही जिल्हाधिका-यांशी चर्चा करुन केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.शहराला पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ३७ दलघमी जलसाठा आहे. पण त्याचवेळी प्रत्यक्षात दरमहा १२ दलघमी पाणीउपसा विष्णूपुरी प्रकल्पातून होत आहे. ही बाब नांदेड शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने गंभीर आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील अवैध पाणीउपसा रोखावा, यासाठी महापालिकेने महावितरणला १४ जानेवारी रोजी एक पत्र देवून प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र बंद करण्याची सूचना केली होती. पाटबंधारे विभागानेही महावितरणला याच विषयावर कळवले होते. १५ दिवसानंतरही कोणतीही कार्यवाही महावितरणने केली नाही. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले.तसेच आगामी काळात नांदेडवरील जलसंकटाची जाणीव करुन दिली. याच विषयावर महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहाने यांच्याशी संपर्क साधला असता महावितरणला महापालिका आणि पाटबंधारे विभागाने विद्युत रोहित्र बंद करण्यास कळवले असले तरीही, महावितरण स्वतंत्र आहे. या विषयावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याशी चर्चा करुन रोहित्र काढण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.एकूणच महावितरणने महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या पत्राला केराचीच टोपली दाखविली आहे. महावितरणच्या या भूमिकेने आगामी काळात नांदेड शहरावरील जलसंकट मात्र आणखी गडद होत आहे.महावितरणची महापालिकेला नोटीसमहापालिकेकडे थकीत असलेल्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने महापालिकेला नोटीस बजावली आहे. महापालिकेकडे महावितरणची ८ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिका दरमहा काही रक्कम महावितरणकडे भरत असते. प्रतिमाह जवळपास सव्वाकोटी रुपये वीजबिल महापालिकेला येत असते. यातील ५० टक्के रक्कम भरणे अपेक्षित आहे. मात्र महापालिका २५ ते ३० लाख रुपये भरते. ३१ जानेवारीपर्यंत वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडArun Dongareअरुण डोंगरेWaterपाणीelectricityवीज