शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अनुदान वाटपाची कोंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:00 IST

२०१६ साली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकविमा न भरलेल्या शेतक-यांना राज्य शासनाने अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. परंतु, अनुदान वाटपाची यादी अंतिम होत नव्हती.

ठळक मुद्दे२०१६ च्या अतिवृष्टी नुकसानीचे ९४ गावांतील शेतकऱ्यांचे धनादेश बँकेत जमा

गंगाधर तोगरे।कंधार : २०१६ साली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकविमा न भरलेल्या शेतक-यांना राज्य शासनाने अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. परंतु, अनुदान वाटपाची यादी अंतिम होत नव्हती. दरम्यान, शेतक-यांचा अंसतोष ‘लोकमत’ने उजागर केल्याची दखल तहसीलदार यांनी घेतल्यानंतर ही कोंडी फुटली आणि १९ डिसेंबर रोजी धनादेश बँकेत जमा करण्यात आला़तहसलीदार यांनी यादी अंतिम करण्यास विलंब करणाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यामुळे यंत्रणा हदरली. ९४ गावांची यादी अंतिम करत १२ हजार ५९३ शेतकºयांचे ६ कोटी ३८ लाख ३४ हजार ८ रूपये अनुदान बँकेत जमा करण्यात आले.२०१६ साली अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पीक विमा भरणा केलेल्या शेतक-यांना विमा रक्कमा मिळाल्या. परंतु विमा न भरलेले शेतकरी आर्थिक अडचणीत आले. अशा शेतक-यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली आणि अनुदान उपलब्ध करून दिले.निधी उपलब्ध असताना शेतक-यांना अनुदान वाटप करण्यासाठीची यादी अंतिम होण्यास विलंब होऊ लागला. त्यामुळे शेतक-यांत असंतोष निर्माण होऊ लागला. ‘लोकमत’ने हा प्रश्न १७ नोव्हेंबरच्या अंकात उजागर केला. याची दखल घेत तहसीलदार संतोषी देवकुळे यांनी घेत संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. यामुळे यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली. आणि ९४ गावांतील पात्र शेतकरी अंतिम यादी तयार केली. अनुदान वाटपाची शेतकरी यादी व अनुदान रक्कमेचा धनादेश जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेत जमा केला. रखडलेल्या वाटप अनुदानाची अखेर कोंडी फुटली. शहर शाखा आपल्या शाखेतील लाभार्थी शेतकरी वगळता संबंधित गावातील संलग्न शाखेत शेतकºयांचा निधी वर्ग करेल. लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात निधी जमा करायला किती दिवस लागेल. हे आगामी काळात दिसेल. अखेर ९४ गावांची अनुदान वाटपाची कोंडी फुटली आहे. परंतु उर्वरित गावांचा मुहूर्त कधी लागणार, हे थोड्याच दिवसांत समजेल. शेतक-यांचे बँक खाते, खात्यावर जमा रक्कमा, प्रत्यक्ष वाटप, ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा बँकेकडे यादी व रक्कम असा प्रवास राहील.६ कोटी ३८ लाख ३४ हजार रूपये अनुदानाची रक्कम बँकेत जमातालुक्यातील ९४ गावांतील शेतकºयांचा जीव अखेर भांड्यात पडला. त्यात सावरगाव येथील ७४ शेतकरी, रूई २१९, कल्हाळी १९७, मसलगा १०८, नारनाळी ९५, मादाळी ६०, येलूर १२९, गोणार १४१, जाकापूर ३९, खंडगाव ९१,वाखरड १८४,दिग्रस खु १६७, गुंटूर ५७, घुबडवाडी ३२, हरबळ प.क.४१, हासूळ ३९, हाटक्याळ ५७, कारतळा ३८, उमरगा १७०,मातनडोह १४,परांडा ५९,हणमंतवाडी ६८, रामानाईक तांडा २५३, कौठावाडी ४५, तेलूर १२८, कंधार ३४, ब्रम्हवाडी २५, पिंपळ्याचीवाडी ४९, भेंडेवाडी १६,बोरी खु. १३२, दिंडा २८, बिंडा १७, गुंडा ५८, आंबुलगा ४०, भुत्याचीवाडी ३६, औराळ ८३, मुंडेवाडी १३९, कंधारेवाडी १६७, बारूळ २९३, वरवंट १०८, मजरे वरवंट २६, चौकीपाया ३८, शिरूर ८६, नंदनवन ३३०, मंगलसांगवी २६८,धानोराकौठा २४८,राऊतखेडा २०६, चौकीमहाकाया ५९,भूकमारी ९१, भंडारकुमठ्याची वाडी १४९, लाठ खु. ३३३, बामणी प.कं.४८४,हाळदा ३३९, शेल्लाळी ६८, टोकवाडी ४४, नवरंगपुरा २१९, मजरेधर्मापुरी ९३, बाळांतवाडी ७५, बहाद्दरपुरा ३९, बिजेवाडी १०३, चौकीधर्मापुरी ६९,गंगनबीड ९५, चिंचोली २०५, पाताळगंगा २४४,उमरज २९२, इमामवाडी १२८, लालवाडी ९४, कोटबाजार ७६, जंगमवाडी ११०, गुलाबवाडी १४५,नवघरवाडी ११४, वंजारवाडी १६०, हिप्परगा शहा २१३, नंदनशिवणी ११९, महालिंगी १९३, बोळका १०६, नावंद्याचीवाडी १६८, कळका २४४, बोरी बु. २१३,रहाटी २७९, काटकंळबा ४३४, पेठवडज १२८, आलेगाव २१२, दाताळा १५०, सावळेश्वर १५४, हाडोळी २५६, मरशिवणी १९८, दैठणा ८१, पोखर्णी ८०, नागलगाव १८५, सोमठाणा २४, गुटेवाडी ३६ , घागरदरा ४३ व दहीकंळबा ३१७ शेतक-यांचा समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडHailstormगारपीटFarmerशेतकरीfundsनिधी