शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

विष्णूपुरीतील पाणी बचावासाठी प्रशासन कठोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:00 AM

विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देअवैध पाणीउपसा रोखण्यासाठी नांदेड, परभणी जिल्ह्यांचे आठ पथकेमहापालिकेची पिण्याच्या पाण्याची तजवीज कशी करायचीविष्णूपुरीत आजघडीला केवळ निम्मा जलसाठा शिल्लक

अनुराग पोवळे।नांदेड : विष्णूपुरीतील झपाट्याने कमी होणारा जलसाठा लक्षात घेता शहराला दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याच्या हालचालींना महापालिकेत वेग आला आहे. दुसरीकडे विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.एकीकडे पाटबंधारे विभागाची सिंचनासाठी पाणी सोडण्याची लगबग तर दुसरीकडे महापालिकेची पिण्याच्या पाण्याची तजवीज कशी करायची याची चिंता महापालिकेला लागली आहे. विष्णूपुरीत आजघडीला केवळ निम्मा जलसाठा शिल्लक आहे. त्यातही आता पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी १५ नोव्हेंबरपासून एक पाणीपाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ते ३० नोव्हेंबरपर्यत सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे.यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील १५ दलघमीहून अधिक जलसाठा कमी होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रकल्पाचा जलसाठा तळाशी जणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात पाणी घेण्यासाठी आता कोणतेही पर्याय शिल्लक उरले नाहीत. येलदरी, सिद्धेश्वरही कोरडेठाक पडले आहेत. या पार्श्वभूमीवर विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा सांभाळण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर आली आहे.‘लोकमत’ ने १३ नोव्हेंबर रोजी नांदेडवरील जलसंकटाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला. प्रभारी जिल्हाधिकारी लहुराज माळी यांनी मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील अधिकाºयांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे आदेश जिल्हाधिकारी माळी यांनी दिले.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, नांदेड, कंधारचे उपविभागीय अधिकारी तसेच गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी यांच्यासह नांदेड, लोहा, पूर्णा, पालम येथील तहसीलदारांची उपस्थिती होती. त्यासह पोलीस विभाग, महावितरणचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. विष्णूपुरीतील अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यासाठी नांदेड आणि परभणी जिल्ह्यात ८ संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये नांदेड तालुक्यातील ४, परभणी २ आणि कंधार उपविभागीय अधिका-यांचे दोन पथके राहणार आहेत. या पथकांना अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश करण्यात आले आहेत. या कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिदिन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र १५ डिसेंबर रोजी बंद करण्याचे आदेशही महावितरणला देण्यात आले आहेत. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत मोटारी काढण्यास राजकीय विरोध प्रारंभी केला गेला. परिणामी अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेली पथके काही ठिकाणांवरुन परत आली होती. आता मात्र पथकांनी कोणताही विरोध न जुमानता कारवाई करण्याचे आदेशही माळी यांनी दिले आहेत.विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा संपल्यानंतर पर्याय उपलब्ध नाहीत. इसापूर प्रकल्पातील पाणी ७५ किलोमीटरवरुन सांगवी बंधा-यात पोहोचते. एक ते सव्वा दलघमी पाण्यासाठी इसापूर प्रकल्पातून १० दलघमी पाणी सोडावे लागते. त्याचवेळी सांगवी येथील महापालिकेच्या पाणी उपसा करणा-या यंत्रणेची क्षमताही अत्यल्प आहे. त्यामुळे इसापूर प्रकल्पातून पाणी घेऊन नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्याची भूमिका व्यवहार्य नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या हालचालीविष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्याने आगामी काळात पाणी उपलब्ध होण्यात अडचणी संभवणार आहेत. पर्यायही उपलब्ध नसल्याने उपलब्ध जलसाठा जास्तीत जास्त कालावधीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली महापालिकेत सुरु आहेत. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत पदाधिकाºयांसह शहरवासियांनाही अवगत केले जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडparabhaniपरभणीHingoliहिंगोलीwater scarcityपाणी टंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण